मराठा समाजात,राज्यात सत्तांतर करण्याची ताकत आहे का?

Share


प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई : कोणतीही राष्ट्रीय सत्ता!उलथापालथ,सत्तांतर,उखडून फेकून देणे किंवा हद्दपार करणे!हे शब्द ऐकण्यास जड व “लयभारी”वाटतात.कारण ह्या शब्दांची वास्तविकता आचरणात आणण्यासाठी कितीतरी मोठी जनशक्तीचा आधार व ताकत लागते. असे सत्तांतरीत अनेक मासले इतिहासात आहेत.
जर्मनीच्या हिटलर शाहीचा अंत!अलीकडचे उदाहरण द्यायचे झाल्यास रशियाच देता येईल. ज्यांनी आपली रक्तरनजीत क्रांती करून रशिया उभा केला! अचानक क्रांतीची ज्योत येथे पेटली व जनतेने सत्तापालट करताना, राष्ट्रीय पुरुष लेनिन व अन्य ऐतिहासिक नेत्यांचे पुतळे जमिनीसपाट केले व त्यावर नाचले.जनतेची की कृती करताना अतोनात हाल झाले, पण ते मागे हटले नाहीत. बांगलादेशचा मासला घ्या! ज्यांनी बांगला देश राष्ट्रघडविण्यास,
मोठा सहभाग घेतला,त्या शेख मूझिबर रहमान ह्यांच्या पुतळ्यांची विटंबनेसहीत तेथील सत्तांतर करताना,जनतेने काय अवस्था केली!हे संपूर्ण जगाने पाहिलं.तर श्रीलंकेतील क्रांती होताना तेथील सत्ताधारी पक्षातील महत्वाच्या व्यक्ती पंतप्रधानासहित अनेकांना
आपला देश सोडावा लागला. तीच परिस्थिती आता महाराष्ट्रात येणार आहे.भारताची आम्हाला माहीत नाही!त्याच्याशी महाराष्ट्रातल्या जनतेच काही लेनादेना नाही.कारण इतका उच्छाद वर्तमान सरकारने व सत्ताधाऱ्यांनी मांडलेला आहे. त्याला सत्तांतर हाच उपाय आहे.कारण ह्या सरकारने अगदी बेरकी आणि बागडी हिंदुत्ववादी प्रेमाचा बागुलबुवा तयार करून भूमिपुत्रांवर अन्याय करून,जे धनवान परप्रांतीयांसाठी पायघड्या लांगुलचालन करीत आहेत!हे षडयंत्र आता लोकांच्या लक्ष्यात यायला लागलेलं आहे. पण ह्याला शह देण्यासाठी किंवा सत्तापालट करण्याची,हिंमत व शक्ती ही फक्त मराठा समाजात आहे.ही ह्या समाजाने!सध्या चालू असलेल्या आरक्षण आंदोलनात दाखवून दिलेल आहे.उद्रेक काय असतो?ह्याच ज्वलंत उदाहरण व त्याच वास्तव दाखवलेले आहे.ह्या आंदोलनाच अनेक जाती धर्माच्या नेत्यांनी कौतुक केलेले आहे.ही एक मोठी गोष्ट मराठा समाजाने,मुंबईसहीत महाराष्ट्रासमोर ठेवलेली आहे. आरक्षण मिळो ना मिळो!तो पुढचा प्रश्न आहे?पण हा समाज एकवटला म्हणजे,वर्तमान व राजवटीला सत्तेला आव्हान आहे.हे निश्चित!कारण ह्या आंदोलनासाठी सरकारने केलेली अवहेलना,हा समाज कधी विसरू शकत नाही.राज्यात व केंद्रात आपलेच बहुमती सरकार आहे.मग हा विषय संसदेत मांडा!करा भांपक व अतिशय स्वार्थी असलेली संविधान व राज्य घटना बदला?याने ह्या मराठा समाजाचे
अतोनात नुकसान झालेले आहे, ती बदलायला भाग पाडा.हे राज्य सरकार करू शकते!पण त्यांना ते करायचे नाही.कारण सत्तेत असलेले मराठा आमदार खासदार यांनाही ते पाहिजेही आहे.पण बोलेल कोण? मग आपल्या तुंबड्या भरा!हेच काम उरलेल आहे,हे जनमत आहे.ह्या मराठा समाजाने लावलेली ताकद ही सत्तापालट करायला पुरेशी आहे.ते काम हाच समाज करू शकतो.असे विधान राजकीय विसश्लेषक करताना दिसतात. तर ह्या समाजाला आता विलक्षण संधी आहे.आरक्षण मिळाले तरी तुम्ही ह्या
भूमिपुत्रपिपासूंना सोडू नका!समस्त जनतेची,इतर जाती धर्मातील लोकनेत्यांची हाक आहे.याची सकल मराठा समाजाने नोंद घावी!असे महाराष्ट्रातील जनतेला मनोमनी
वाटते.


Share

2 thoughts on “मराठा समाजात,राज्यात सत्तांतर करण्याची ताकत आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *