मराठा समाजाने,कुणबी समाजास का गृहीत धरावे?

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई,बऱ्याच वर्षांपासून,मराठा समाज हा आपल्या रास्त मागण्यांसाठी,झगडत आहे.त्यासाठी सय्यामाने व लोकशाही पद्धतीने प्रदर्शन,मोर्चे व उपोषणे असे आंदोलनाचे मार्ग अवलंबून संघर्ष करत आहेत.त्यावेळी जर डॉ. बाबासाहेबांचे ऐकले असते तर मराठा समाजाला ही आरक्षण त्याच काळात मिळाला असत पण दुर्दैवाने त्यावेळी मराठा समाजाने आरक्षण नाकारल्याने त्याचे परिणाम आज उमटत आहेत.

मराठा समाज आत्ता जागा झाला!आत्ता हे सरकार त्यांना आरक्षण देण्यास,हतबल आहे.म्हणून कि काय

आश्वासनांची खैरात वाटप कधीपर्यंत होणार?

महाराष्ट्राचा इतिहास मराठ्यांनी इतर अठरापगड जातींना घेऊन रचला.अशी ही त्याची गौरवशाली गाथा आहे.पण आता ह्या समाजाची अवस्था काय आहे ?आज महाराष्ट्राच्या राजकारणात तर भरगोस मराठा आमदार,खासदार आहेत? त्यांना लाजा वाटत नाही का?आपल्या ह्या गौरवशाली समाजा बद्दल!मुळात त्यांनी पेटून उठायला हवे होते!आरक्षण नाही तर राजीनामे द्याला हवे होते. मात्र तसं झाल नाही व होणार ही नाही मराठे स्वार्थी आहेत.सद्या उपोषण करत, आम्हाला सरसकट”कुणबी दाखला” मिळावा अशी मागणी करीत आहेत.कुणबी समाजात राष्ट्रीय पातळीवर कार्यरत एकही नेता नाही.1950 दशकांत फक्त कै.श्यामराव पेजे,ह्यांनी प्रयत्न केला.पण त्यांना सहकार्य मिळाले नाही.कदाचीत त्यावेळी कुणबी आत्ता एवढा सुशिक्षित व जागृत आहे तेवढा नसावा!पण आता हा समाज इतरांच्या बरोबरीत आहे.फक्त प्रहारिक नेतृत्व कमी पडतंय.ह्याचा अर्थ असा ही होत नाही की कुणीही उठावे व ह्या समाजावर आपला हक्क सांगावा! व अन्याय करावा.आता हा समाज एवढा षंढ नाही.आत्ता तो रामागडी बानकोटी नाही.आत्ता ते आपल्या हक्का साठी लढा उभारायला सक्षम आहेत.कुणबी व मराठा हा संघर्ष आपल्याला करायचा नाही.कारण कुणबी ही मराठा पोटजात आहे.पण मराठा समाजाने आपला लढा स्वाभिमानाने लढावा.कोणत्याही इतर जातीच्या कुबड्या का घयाव्या?आपल्या गौरवशाली इतीहासाला तडा का द्यावा?स्वाभिमानाने कोणत्या जाती जमातीला, हात न लावता आपले आरक्षण मिळवावे त्यासाठी केंद्र सरकारला घटना दुरुस्तीला भाग पाडावे इतर समाजाची परवा करू नका.ते सरकारच काम आहे.नागपुरकर भट्टांपासन सावध राहा.आपल्या मुद्यांवर ठाम रहा.आपल्या राजकारणात घरचेच भेदी आहेत,हे लक्षात ठेवा.उगाचच कुणबी समाजाच्या आरक्षणाला हात घालून संघर्ष वाढवू नका!सरकारला यादवी माजवून, इंग्रज निती आजमावयची आहे,हे जाणून घ्या.हा मराठा समाज अनेक पक्षात विखुरलेला आहे.त्यामुळेच सरकारचे फावते.हे लक्षात घ्या!सगळ्या गोष्टी फिरून फिरून, राजकारणावर येतात आणि ते राजकारण म्हणजे बहुमोल मतदान!हीच मोठी ताकत जनतेची आहे.आत्ता निवडणुका येत आहेत,तेव्हा आपला उमेदवार ठरवा व मतदान करा?ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्या!मतदाना पर्यंत ही गाजराची पूनगी रेटून न्या!मग मतदान हे ह्त्यार आपल्या हाती आहे.उगाचच कुणबी समाजाचा रोष अंगावर घेऊ नका.येणाऱ्या मतदानातून,काट्याने काटा काढा.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *