प्रतिनिधी: सुरेश बोर्ले
मुंबई :हिंदी भाषा सक्तिविरोधी,दणक्याने जीआर.रद्दबादल झाल्याबद्दल, सामान्य मराठी जनतेसाठी हा एक सणच आहे.कारण भाजपाच बेगडी व दिशाभूल करणार हिंदुत्व आता लोकांसमोर उघड पडलेले आहे.हिंदुत्वाच्या नावाखाली,मराठी अस्मितेचा गळा दाबायला निघालेल्या ह्या विदर्भवादी चोरांची उलटी बोंबाबोंब सुरू आहे. कि हा जी आर.शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सही केलेला आहे.अहो तो सही करावाच लागतो.तो केंद्रातून आलेला आहे. सही करून पोचपावती द्यावीच लागते. हे आपण बुद्धिजीवी असून,तुम्हाला कळत नाही का?तो त्यांनी नंतर जनतेवर लादला का?जनतेने त्यांना कुणीही असो! विरोध हा नक्की केला असता,ही काळ्या दगडावरची रेष होती.तेवढे माजी मुख्यमंत्री हुशार होते.पण तुमच्या सारखे हिंदुत्ववाद्यांचा खोटा बुरखा पांघरून,पाठीत खंजीर खुपसणारे नव्हते.असो! कांहीं दिवसांनी अस्मिता मोर्चा निघणार होता,पण भाजपाने नांगी टाकल्याने, हा मोर्चा स्थगित करावा लागला.म्हणून जनतेची इच्छा आहे की,हा एक क्षण “सण उत्सव”म्हणून साजरा व्हावा ही मनोकामना स्थानिक जनतेची आहे. कारण आधीच राजकीय व्यक्तींनी!हा मोर्चा कोणत्याही राजकीय ध्वजाचा नसेल,तर तो फक्त मराठी अस्मितेवर घाला घालणाऱ्यानच्या विरोधात मातृभाषिकांचाच असेल!त्यामुळे हा एक सण म्हणूनच उत्सव साजरा करावा ही मराठी प्रत्येक जन्मानसाची मनोकामना आहे.त्यामुळे हा सणाला सभेच स्वरूप प्राप्त होऊन,अनेकमराठी प्रेमी दिग्गजांनी मार्गदर्शन करावे ही स्थानिक भूमी पुत्रांची, मराठी साठी एकवटलेल्या सर्वसामान्य मराठी लोकांची, हितचिंतकांची ही साधी त्यांच्या मनातली इच्छा आहे ती शनिवार दिनांक 5 जुलै ला पूर्ण होणार असल्याने मराठी वर प्रेम असलेला प्रत्येक जण आनंदी झाला आहे. तसेच या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने सामान्य मराठी माणसात उत्साह आहे.
बरोबर