प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,:राज्यातील ‘ट्रिपल इंजिन’ सरकार भ्रष्टाचाराचे आगार बनले असून मुंबईत भ्रष्टाचाराचे मॉडेल बनवले आहे. गिरगावात मेट्रो स्टेशनजवळच्या रस्त्यात बेस्ट बस थेट पाच फूट खोल खड्ड्यात गेली. हा एक अपघात नसून बेस्टट खड्ड्यात घालण्याचा प्रकार आहे. मुंबईला लुटून सत्ताधारी स्वतःचे खिशे भरत आहेत तर दुसरीकडे मुंबईकरांचा जीव मात्र धोक्यात घालत आहेत. मुंबईतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करा अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, बेस्ट बस खड्यात जाणाची घटना ही यंदाच्या पावसाळ्यातली पहिली घटना नाही. मुंबईला सत्ताधारी पोखरले आहे, भ्रष्टाचाराचे जाळे इतके खोलवर आहे की सध्या मुंबईत जागोजागी रस्ते खचत आहेत. भाजपचे सरकार ६०/४० ची सरकार आहे — ६० टक्के पैसे खाऊन टाकतात! यांच्याकडून फक्त भ्रष्ट्राचाराचाच विकास होऊ शकतो, मुंबईचा नाही. रस्त्यावरील खड्डे हा एकच मुद्दा नसून विक्रोळीत पुलावर खड्डे पडले आहेत. मध्यंतरी अटल सेतूला जोडणारा रस्ता खचला होता. भुयारी मेट्रोतही पहिल्याच पावसात पाणी शिरले, कोस्टल रोडला तडे गेले आहेत. हा भाजपा युती सरकारचा विकास नसून भ्रष्टाचार आहे, बीएमसीतील प्रशासक राजच्या माध्यमातून सत्तेतील तीन पक्ष मुंबईला खड्डयात घालत आहेत, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Gd