
प्रतिनिधी – मिलन शहा
मुंबई : बी.आर. चोप्रा यांच्या ऐतिहासिक ‘महाभारत’ मालिकेत ‘कर्ण’ची अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, पंकज धीर हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. या प्राणघातक आजारावर मात करण्यात ते अपयशी ठरले आणि अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
पंकज धीर यांनी ‘महाभारत’ व्यतिरिक्त अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि ‘कर्ण’च्या भूमिकेमुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.
Rip
आदरांजली