“महाराष्ट्राची हास्य जत्रा”, निखळ विनोदी जत्रा!

Share


प्रतनिधी:सुरेश बोरले

मुंबई,सोनी मनोरंजन चॅनलवर दिवसभर, एक हास्य विनोदाचा कार्यक्रम!अगदी दिलखुलासपणे सुरू असतो,तो म्हणजे “महाराष्ट्राची हास्य जत्रा”निखळ विनोदाची बरसात आहे हा कार्यक्रम,कार्यक्रमाची धुरा वाहणारे श्री.गोस्वामी सर,हेच सर्वे सर्व ह्या कार्यक्रमाचे म्होरके आहेत,कांहीं जुने कांहीं नवे विनोदवीर महिला व पुरुष नटांची मांदियाळी येथे आपल्याला येथे पहायला मिळते.ह्या कार्यक्रमातील, काही कलाकारांना आत्ता चित्रपट व नाटकातही संधी मिळालेली आहे,हे विषेशआहे.येथे ठराविक नावे न घेणे चांगले.कारण ह्या कार्यक्रमात,एकमेकांची सांघिक बधीलकी इतकी सुंदर आहे की!ह्या निर्मिती मधे हिशोबनिस म्हणून काम करणारे कर्मचारी, आता ह्या कार्यक्रमात महत्वाची भूमिका तीही भक्कम ताकतीने निभावत आहेत.म्हणजेच निर्मत्यांनी त्यांनाही आपल्या अंगचे कलागुण प्रेक्षकांन समोर दाखवण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे,ही एक मोठी गोष्ट आहे.ह्या जत्रेमुळे!इतरही कार्यक्रम फीके पडत आहेत. इतका बहारदर कार्यक्रम!हा दूरचित्रवाणीवर लोकप्रिय झालेला आहे.अडथळा किंवा व्यतय म्हणजे,मधे मोठ्या दाखविल्या जाणाऱ्या जाहिराती.पण तो टी आर पी चा भाग आहे.कारण लोकप्रिय कार्यक्रमालाच,
जहिरातदार पसंती देतात.आकर्षित करणाऱ्या विनोदीनटानबरोबर,निवेदन,
संगीत,सेट्स,सादरीकरण, प्रकाश योजना ह्यांचा सुंदर मिलाप आणि सहकार्यामुळे,हा कार्यक्रम आणखीनच खुलतो. असाच हा कार्यक्रम, पुढें पुढें जात रहावो,हीच तमाम प्रेक्षकांची ह्या कार्यक्रमाला मनापसन हार्दिक सदिच्छा!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *