निवडणूक:झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पुढील काही दिवसात जाहीर होण्याची दाट शक्यता.
येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राज्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात. झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीची तयारी जाणून घेण्याचे काम सद्या निवडणूक आयोगाने सुरू केले आहे.
27 आणि 28 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे.निवडणूक आयोगाने सोमवारी झारखंडला भेट दिली. कदाचित 28 सप्टेंबर ला राज्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्या अनुषंगाने संभावित उमेदवार आणि राजकीय पक्ष आप आपल्या परीने तयारीला लागले आहेत.