
एसएमएस -प्रतिनिधी – उत्कर्ष बोर्ले
मुंबई, : महाराष्ट्राच्या भूमीवर प्रथमच ‘मिस्टर, मिस आणि मिसेस इंडिया प्लस साईज ब्युटी पेजंट 2026 (सीझन 2)’चा भव्य ग्रँड फिनाले सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ‘कर्वी ग्लॅमर इव्हेंट’ या नावाने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा बॉलिवूड शैलीत सादर करण्यात आला.
या उपक्रमाच्या प्रमुख आयोजक व समाजसुधारक मेघना शेंडगे यांनी या पेजंटचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, सौंदर्य हे केवळ बाह्य रूपात नसून आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वात असते. बॉडी शेमिंगविरोधात सकारात्मक संदेश देत बॉडी पॉझिटिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी या प्लस साईज पेजंटची संकल्पना राबविण्यात आली.
मेघना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना प्रेरणा देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असते; फक्त त्याला योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
🏆 विजेते 🏆
मिसेस इंडिया प्लस साईज
प्रथम विजेती – अर्पिता ठाकूर कोठारी (आर्किटेक्ट)
उपविजेती – मोनिका तिवारी (शिक्षिका)
द्वितीय उपविजेती – दिपाली वसंत (फायनान्शियल अॅडव्हायझर)
मिस्टर इंडिया प्लस साईज
प्रथम विजेता – पुष्पक पाटील (कॉमेडी कलाकार)
उपविजेता – अरविंद कुमार सिन्हा (क्लब मॅनेजर)
द्वितीय उपविजेता – पंकज शर्मा (फिटनेस ट्रेनर)
मिस इंडिया प्लस साईज
प्रथम विजेती – सई शेंडगे (हिप-हॉप नृत्यांगना)
उपविजेती – विभूषा कांदळकर (लावणी नृत्यांगना)
सबटायटल विजेते
सरिता गुप्ता – फोटोजेनिक फेस
रीना सोबती – इंटेलेक्च्युअल आयकॉन
अश्विनी जोशी – कॉन्जेनियलिटी आयकॉन
रेश्मी मुंसी – कॉन्फिडेंट क्वीन
विजेत्यांना आकर्षक क्राउन, सॅश, ट्रॉफी, प्रमाणपत्रे तसेच विविध भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. तीन दिवसीय विशेष प्रशिक्षणानंतर स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण करत हा मान पटकावला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला अनेक नामवंत मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये:
महाराष्ट्र शासनाचे मंत्री आशिष शेलार
सुप्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस
माजी पालकमंत्री व आमदार असलम शेख
सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल
अभिनेते गोविंदा
दिग्दर्शक राजीव रुइया
सेलिब्रिटी अभिनेत्री नताशा नाटी
सर्व मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन करून आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
हा सोहळा केवळ फॅशन आणि ग्लॅमरपुरता मर्यादित न राहता आत्मविश्वास, स्वाभिमान आणि बॉडी पॉझिटिव्हिटीचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आयोजक, प्रायोजक, परीक्षक आणि स्पर्धकांचे विशेष योगदान लाभले.

Good initiative