
प्रतिनिधी:मिलन शाह
वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ योजना, शेतक-यांचे प्रश्न, राज्यपालांनी केलेला महाराष्ट्राचा अवमान या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवार, दि. 5ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता कमला नेहरू पार्क (हँगिंग गार्डन) ते राजभवनापर्यंत मोर्चा काढून राजभवनाचा घेराव आणि जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.