मुंबई प्रतिनिधी | एसएम समाचार सुरेश बोर्ले
“ज्याचे काम तोच करू शकतो, दुसऱ्याने केल्यास तो गोत्यात येतो” — सोशल मीडियावर टीकेची झोड
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांच्या भाजपा प्रेमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोठारे हे भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचं गौरवगान करताना दिसत आहेत. त्यामुळे रसिकवर्गातून आणि समाजमाध्यमांवरून त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे.
“ज्याचे काम तोच करू शकतो, दुसऱ्याने केल्यास तो गोत्यात येतो” ही म्हण कोठारे यांच्या सध्याच्या वक्तव्यांवर अगदी फिट बसते, असं लोक म्हणत आहेत. कारण महेश कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांनी झपाटलेला, दे धक्का, पंडू यांसारखे अनेक लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. मात्र अलीकडे ते राजकीय विषयांवर विशेषतः भाजपा समर्थनार्थ उघडपणे बोलताना दिसत आहेत.
प्रश्न असा उपस्थित होत आहे की — राजकारण हा त्यांचा विषय नाही, मग एका पक्षाच्या बाजूने जाहीर मतप्रदर्शन करणं कितपत योग्य आहे?
चित्रपटसृष्टीतील जाणकार सांगतात की, दिग्गज कलाकार दादा कोंडके यांना “सोंगाड्या” चित्रपटासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या मदतीनेच दादर येथील कोहिनूर थिएटर मिळाले होते. तसेच आजही मनसे पक्ष मराठी चित्रपटांसाठी नेहमी पुढाकार घेत असतो.
चाहत्यांची भूमिका स्पष्ट आहे —
“मराठी चित्रपटांसाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणाऱ्यांचे आभार मानावेत. मगच इतर पक्षांच्या उपकारांबद्दल बोलावं. मराठी जनतेनेच तुम्हाला उचलून धरलं आहे, त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर राखावा.”
शेवटी, मराठी रसिकांनी एकच संदेश दिला आहे —
“मतदान हा वैयक्तिक आणि गुप्त अधिकार आहे. पण जनतेच्या प्रेमाने मिळवलेली ओळख राजकीय प्रसिद्धीसाठी वापरणं योग्य नाही.”
स्वाहितसाठी कहिपण
Yanni Gujrat la jave