माजी सैनिक चंद्रशेखर सावंत यांना समाजरत्न पुरस्कार.

Share

मुंबई : माजी सैनिक व पश्चिम रेल्वेतून मोटरमन म्हणून निवृत्त झालेले चंद्रशेखर सावंत यांना नुकताच राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला असून येत्या १२ ऑक्टोबर २०२५ रोजी आदर्श रायगड वृत्तपत्र व वृत्तवाहिनी च्या वर्धापन दिनानिमित्त बदलापूर येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत तो प्रदान करण्यात येणार असल्याचे कार्यकारी संपादक शैलेश सणस यांनी सांगितले. जुलै २०१८ मध्ये मोटरमन म्हणून कार्य करत असताना इमर्जेन्सी ब्रेक दाबून अंधेरी येथील गोखले ब्रीज ट्रेनवर पडण्यापासून सावंत यांनी हजारो प्रवाशांचे प्राण वाचविले होते.तेव्हा तत्कालीन रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी त्यांना कर्तव्यदक्ष मोटरमन पुरस्कार आणि रोख पाच लाख रुपये बक्षीस दिले होते. सावंत आजही अनेकवेळा स्वतः विविध वंचित,अनाथ, वृद्ध, गरजू यांना जॉय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदत करत समाजसेवा करीतच असतात. अशा या आदर्श व्यक्तिमत्वाला समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला म्हणून समाजातील विविध स्तरातून गौरव व अभिनंदन होत आहे.


Share

2 thoughts on “माजी सैनिक चंद्रशेखर सावंत यांना समाजरत्न पुरस्कार.

  1. अभिनंदन सर अपले नाव जगात गाजत राहु दे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *