मालवणीचा राजा चे हिरक महोत्सव..!!

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : मालाड, मालवणी चा राजा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ४/५ स्थापना १९६६ साली झाली मालाड मधील हे पहिले मंडळ हिरक महोत्सव साजरा करत आहे. मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी व संस्कृती जपत लहान मुलांना प्रबोधन व क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात तसेच महिलांना खेळ पैठणी चा हा विशेष आकर्षण असलेला खेळ खेळवला जातोविशेष म्हणजे हे मंडळ सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालतो. या वेळी मंडळाच्या कार्याकरते हिरक महोत्सवात स्वता प्रत्येकी ₹६हजार रुपये सहयोग निधी म्हणून दिले तसेच गणपती च्या आगमना पूर्वी पासून ते विसर्जन पर्यंत सर्वच कामात सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. त्या दृष्टीने मालवणीचा राजा हा सर्वधर्म समभाव चा प्रतीक मानला जातो.

यंदा राजा साठी विशेष देखावा, स्टेज आणि आकर्षक प्रवेशद्वार बनवण्यात आले आहें. ६० वर्षा आधी या मंडळाची स्थापना झाली होती तेव्हा पाऊण सतत अविरत गणपती चे आयोजन करण्यात येत आहें. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश चवाथेयांनी दिली आहें.


Share

2 thoughts on “मालवणीचा राजा चे हिरक महोत्सव..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *