मालवणीच्या राजाचे आगमन आणि विसर्जन ही खड्ड्यातूनच??

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई: मालवणीतील सर्वात मोठ्या गणपतीचे आगमन आणि विसर्जन ही खड्ड्यातूनच. मालवणी गेट क्रमांक ५. सानेगुरुजी वसाहत येथीलसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ४आणि ५ मालवणीचा राजा हा मालवणीतील सर्वात जुना गणपती मंडळ आणि येथील गणपती हा सद्या मालवणीतील एकमेव  हिरक महोत्सव साजरा करणारे गणपती मंडळ  आहे. या गणपती मंडळाचे सतीश चवाथे  यांनी या बाबत पालिकेच्या समन्वयक बैठकीत हिब्या बाबत तसेच ऑनलाईन तक्रार केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन  त्यांना सानेगुरुजी वसाहत गेट क्रमांक ४आणि ५ मधील या रस्त्यावर खड्ड्यामुळे गणपती च्या आगमनात आणि विसर्जना साठी होणाऱ्या त्रास आणि अडचणी बाबत माहिती व तक्रार करून ही पालिका पी उत्तर विभागातून हे खड्डे बुजवले जात नाही त्यामुळे परिसरात आणि  सार्वजनिक मंडळात या बाबत नाराजी व्यक्त होत असून गणेश भक्त ही पालिका प्रशासना बाबत संताप व्यक्त होत आहेत..

या बाबत आम्ही या बाबत पालिका पी-उत्तर विभागीय समन्वयक बैठकीत ही या खड्ड्या बाबत माहिती दिली होती मात्र या बाबत कोणते ही पाऊल पालिका प्रशासनाने उचललेले नाहीत. त्यामुळे आमच्या गणपतीचे आगमन खड्ड्यातून झाले आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर विसर्जन ही खड्ड्यातूनच –सतीश चावाथे-मालवणीचा राजा सार्वजनिक गणपती मंडळ ४-५ -अध्यक्ष (मालवणी चा राजा)


Share

2 thoughts on “मालवणीच्या राजाचे आगमन आणि विसर्जन ही खड्ड्यातूनच??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *