मालवणी पोलिस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन.

Share

प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले

मुंबई : मालाड,मालवणी पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
प्रदीप निवृत्ती कदम, संजय तुकाराम रासकर, विकास साहेबराव माळी आणि महेंद्रकुमार शामराव मराळ या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  *निलंबनाचे कारण*
कर्तव्यावर असताना मालवणी मोबाईल-१ या गाडीवरील कसुरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

निलंबन आदेश*

  • प्रदीप कदम यांना २६ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले असून २७ सप्टेंबर रोजी आदेश स्वीकारले गेले.
  • संजय रासकर, विकास माळी आणि महेंद्र मराळ या तिघांनाही २६ सप्टेंबर रोजी निलंबन आदेश देण्यात आले असून त्यांनी २७ सप्टेंबर व ३ ऑक्टोबर रोजी आदेश स्वीकारले आहेत.
  •  पुढील कारवाई:
  • निलंबित कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Share

2 thoughts on “मालवणी पोलिस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *