
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब व मा. रश्मीताई ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत
मुंबई :मागठाणे मित्र मंडळ आयोजित आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ व १४ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मालवणी महोत्सव २०२५’ हा उत्सव उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला.
या भव्य महोत्सवात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, विविध पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, कलाविष्कार, तसेच युवकांचा सक्रीय सहभाग यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्कट आयोजन करून हा महोत्सव आनंद, संस्कृती आणि शिवसेनेच्या एकतेचा सोहळा ठरविला.
या महोत्सवात स्थानिक नागरिक, शिवसैनिक, पदाधिकारी आणि विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मस्स्त
अगदी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला..
Good
Goood