प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : मागील वर्षी मालवणी, अंबोजवाडी येथील मनपा शौचालयाच्या सेप्टीक टँक मध्ये पडून खाजगी कामगार असलेल्या रामलगन केवट व त्यांचे दोन मुलगे विकास केवट, सुरज केवट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार अस्लम शेख यांनी राज्यसरकार व महानगरपालिका यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मृतकांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेकडून आधी ₹ ३० लाख व शुक्रवारी ₹ ६० लाख असे एकूण ९० लाखांचे धनादेश वितरित करण्यात आले.
गेल्या वर्षी घडलेल्या दुर्घटनेत रामलगन केवट यांच्या पत्नी इंद्रावती केवट यांनी आपले पती व दोन मुलगे गमावले. कुटुंबाचा आधारच गेल्याने लहान मुलाचा, मुलीच्या भवितव्याचे काय हा प्रश्न इंद्रावती यांच्या समोर उभा राहिला होता. इंद्रावती यांचे सासरे देखील वयोवृद्ध व आजारपणाने बेजार झालेले असल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील उभा राहिला.
स्थानिक आमदार या नात्याने आमदार अस्लम शेख यांनी केवट कुटुंबीयांना काही मदत मिळावी यासाठी राज्यसरकार व पालिकेशी सातत्यपुर्ण पाठपुरावा चालू केला. त्यांच्या ह्या पाठपुराव्याला यश मिळालं आणि मृत रामलगन केवट यांच्या पत्नी इंद्रावती यांना ₹ ३० लाखांचे सहाय्य करण्यात आले. मात्र ही मदत पुरेशी नव्हती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्या नंतर पालिकेकडून आमदार अस्लम शेख यांच्या हस्ते आज ₹ ६० लाखांचे धनादेश वितरित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना शेख म्हणाले, केवट कुटुंबीयांनी जे गमावल त्याची भरपाई होऊ शकत नाही. मात्र ह्या रकमेमुळे केवट यांच्या पत्नी इंद्रावती व त्यांचा मुलगा व मुलगी यांचे भविष्य सुरक्षित होईल.
Rip
Rip for people who lost their lives
Good relief but 3 members lost cannot be filled