
फोटो :अश्विनी अमित पवार, पती अमित पवार, आई शोभा माने, वडील किसन माने, भाऊ विकास माने आणि सत्कार करताना सुनील गमरे.
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : मालाड (पूर्व) येथील रहिवासी व ‘अश्मी नृत्यालय’ या नृत्यसंस्थेच्या स्थापिका सौ. अश्विनी अमित पवार यांना माटुंगा येथील मैसूर हॉलमध्ये आयोजित ALL INDIA 18th CULTURAL NATIONAL DANCE CONTEST & FESTIVAL ( नृत्य अनुभूती) पर्वात ” सोलो ओपन कॅटेगरी आणि जूनियर ग्रुप सेमी क्लासिकल” स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. संपूर्ण देशभरातून स्पर्धकांनी भाग घेतलेल्या या भव्य सोहळ्यात अश्विनी अमित पवार ह्यांचा हा मानाचा विजय ठरला.
मालाडमध्ये आयोजित या सत्कार समारंभात बौद्धजन पंचायत समिती विश्वस्त, मालाड विभाग प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) अध्यक्ष मालाड विधानसभा प्रमुख सुनील गामरे यांनी सौ. अश्विनी अमित पवार ह्यांचा सत्कार करत त्यांच्या कलेतील योगदानाचे कौतुक केले.
सत्कार प्रसंगी सुनील गामरे यांनी अश्विनी अमित पवार ह्यांच्या भारतीय शास्त्रीय नृत्यातील निष्ठा आणि परंपरेच्या जतनासाठीच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. तसेच, त्यांचे यश केवळ मालाडच नव्हे तर संपूर्ण समाजातील कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी अश्विनी पवार यांनी आपल्या यशाचे श्रेय गुरुजनांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमाला दिले. त्या म्हणाल्या, “हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही; तो माझ्यासोबत उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचा आहे.”
राष्ट्रीय स्तरावरील हा विजय भारतीय कलासंस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांच्या समर्पणाचा आणि मेहनतीचा उज्ज्वल नमुना मानला जात आहे.
Good