मालाड मध्ये भीषण अपघातात दोघांचादुर्दैवी अंत…

Share

प्रतिनिधी :मिलन शाह

मुंबई,मालाड पश्चिमेतील काचपाडा क्रमांक 1 रामचंद्र लेन येथे ग्रेटर बँके समोर वेगवान दुचाकी ने वॉटर टँकर ला धडक दिल्याने  दोघ तरुणांचा मृत्यू. दिनांक 25डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता च्या सुमारास वेगवान दुचाकीने पाण्याच्या गजराज वॉटर  टँकर क्रमांक एम ech-48/ए जी 4563,ला धडक दिल्याने दुचाकी स्वार तसेच दुचाकी वरील सहप्रवासी टँकर खाली चिरडले गेले व त्यात ते गंभीर जख्मी झाले. या दोघ तरुणांना कांदिवली येथील पालिकेचे डॉ. बाबासाहेब रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथं डाक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. दोघ तरुणांची ओळख पटली नाही पोलीसांनी अपघाती गुन्हाची नोंद करून पुढील तपास करत आहेत.


Share

One thought on “मालाड मध्ये भीषण अपघातात दोघांचादुर्दैवी अंत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *