मालाड सबवेतील पंप बंद का??

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

मुंबई : मालाड पश्चिमेला पूर्वेशी जोडणाऱ्या सबवेतील पालिकेचे दोन्ही पंप बंद आहेत. मालाड सबवेत जोरदार पावूस आळा की पाणी भरतो आणि त्यामुळे वाहतूक बंद पडते तसे होऊ नये व पावसाच्या पाण्याचा निचरा वेळेत होण्यासाठी तसेच पाणीच साचू नये या साठी  पालिकेने तीन जनरेटर सह दोन मोठं मोठे  पंप लावले आहेत. मात्र आज मंगळवारी दिनांक १५ जुलै रोजी सकाळ पासून जोरदार पावूस  पडत आहे मात्र हा पावूस थांबून थांबून पडत असल्याने नैसर्गिक रीतीय पाण्याचा निचरा होत आहे. मात्र मालाड सबवे मधील पम्प बंद असल्याने येथे काही प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने ही परिस्थिती आहे. तसेच या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी व वाहतूक  व शहरी पोलीस, अथवा होम गार्ड पारा देण्यासाठी व परिस्थिती वर नियंत्रण ठेवण्यासाठी  नसल्याने जर अचानक या सबवेत पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात साचले तर काय परिस्थिती होईल. जागरूक नागरिक कृष्णा वाघमारे यांनी या बाबत पालिकेच्या हेल्प लाईन वर संपर्क करून माहिती दिल्याचे सांगितले. मागील दुर्घटनेतून पालिके ने बोध घेतलेला दिसत नाही.

काही वर्षा पुतवी या सबवेत जीप अडकून पावसाच्या पाण्यात त्यात असलेले २ जणांचा जीव गेला होता. तसेच मागील वर्षी एक कार वाहून गेली होती दुदैवाने त्यात कोणी नव्हते. लगतच मोठा नाला असल्याने या नालात ही पाणी तुंबून भरतो त्यामुळे हा सबवे जोरदार पावसात  धोकादायक बनतो.


Share

One thought on “मालाड सबवेतील पंप बंद का??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *