
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे.
मुंबई :मालाड स्थानकाच्या पूर्वेकडील स्कायवॉक वरील छप्पर काढून टाकल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना थेट उन्हात चालावे लागत आहे.
दररोज हजारो प्रवासी या स्कायवॉकचा वापर करतात. मात्र छप्पर नसल्याने कडक उन्हामुळे प्रवाशांचे हाल होत असून अनेकांना उष्माघाताचा त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले यांना याचा अधिक फटका बसत आहे.
स्थानिक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कामाची गती मंद असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. “छपराचे काम कधी पूर्ण होणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रवासी वर्गाने रेल्वे अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन छप्पर बसवण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी हे काम त्वरित पूर्ण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Verybad