
मुंबई,मुंबई सह राज्यात पावूस पडावं या साठी मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज अदा केली.माहीम येथील बिस्मिल्लाह मशिदित मौलाना शकील खान पठाण यांच्या नेतृत्वात मुंबई सह राज्यात पावूस पडावा या करीता नमाजे इस्तीसका म्हणजेच विशेष नमाज चे सामूहिक पठण करण्यात आले. तसेच सामूहिक पणे अल्लाह (ईश्वर )कडे हात पसरून राज्यात पावूस पडावा या साठी प्रार्थना करण्यात आली या वेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील नागरिकांनी पावसा साठी विशेष नमाज पठण केली. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते इरफान मच्छी वाला यांनी एसएमएस ला दिली.
निसार अली