मुंबई उच्च न्यायालयाने, महाराष्ट्रातील सहा महापालिका आयुक्तांना चांगलेच झापले !

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई,आज शासन करते किंवा सरकार मजबूत पायावर उभे नाहीत?आज महाराष्ट्रात प्रत्येक बाब न्यायला जाते.मग ती समस्या कोणतीही असो? सामाजिक कामाची असो व इतर! सर्वच गोष्टी जर न्यायालयात निर्णयीत करायच्या असतील? तर मग सरकारी यंत्रणेत, महत्त्वाच्या हुद्द्यानवर, बसलेल्या माणसाची गरज काय? मोठ्या हुद्द्यांवर असलेली माणसे नीट कामे करीत नाहीत, कामाचे अनुशासन व्यवस्थित नाही, नाही तर आपला स्वार्थ जपणारी माणसे अधिक त्यांच्या आसपास असतील? म्हणून विकसित कामे होत नाहीत. यंत्रणेत काहीतरी गडबड नक्कीच आहे,?असे जनतेला वाटते. विकसित कामे आडल्यावर, मग कोणीतरी न्यायालयात याचिका दाखल करतो व निर्णय येतो. न्यायालयात जाईपर्यंत ची वेळ येऊच देऊ नका? तर कामे कशी चांगली व लवकर होतील यावर जोर द्या! न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्या ची वेळच येणार नाही. कारण न्यायालयाला इतर न्याय निवाड्यानची ची कामे आहेत, फक्त तुमच्या कामासाठी न्यायालय नाही,? न्यायालयात वायफळ वेळ जातो. खर्च होतो, अशा कृत्यांनी लोकांना त्रास होतो. शेवटी जनताच तोंडघशी पडते. असंच काहीस घडलेय? त्याचा वृतांत! बातमी स्वरूपात दूरचित्रवाणीवर देण्यात आला. महाराष्ट्रातील सहा महापालिका आयुक्तांना उच्च न्यायालयाने,रस्ते दुरुस्ती, मॅन होल्स व इतर कामांसाठी, आयुक्तांना झापले. हे शब्द ऐकून, एक प्रकारचा आय.ए.एस. व तत्सम अधिकाऱ्यांचा तिटकारा आला. कारण न्यायालयाने झापलेल्या, महापालिकांमध्ये मुंबई,ठाणे सह इतरही महत्त्वाच्या, शहरांच्या आयुक्तांची नावे आहेत. न्यायालयाने विशेष करून, पावसामध्ये रस्त्यांवर ची परिस्थिती खड्डे व मॅन होल्स, ह्या समस्येवर थोबडले आहे. या खड्डेयुक्त रस्त्यावर, अनेक वाहनांचे व पादचाऱ्यांचे,अपघात होतात. तर उघड्या असलेल्या मॅन होल्स मध्ये पडून,लोकांचा मृत्यू होतो. हे प्रकार सर्रास घडलेले असल्याने, न्यायालयाने ही बाब लक्षात घेऊन,राज्यतील सहा आयुक्तांना फटकारले,हे उत्तमच आहे. कारण जनतेने फाटकावून चालत नाही. न्यायालयाने बांबू घातला, जातो मग यंत्रणेवर लगाम येतो.ह्याचा अर्थ! जनतेच्या दंडुक्या चा काहीच उपयोग नाही. एकट्या मुंबईत महापालिकेच्या अखत्यारित एक लाखाहून अधिक मॅन होल्स जागो जागी आहेत. म्हणजे रस्त्यावर किती प्रमाणात खड्डे असतील?याची जनतेने कल्पना करावी? ह्या शहराची अवस्था काय आहे? लोकांना किती धोका पावसाळ्यात आहे. एकीकडे रस्त्यावर मरणाचे खड्डे, दुसरीकडे भयानक मॅन होल्स, अर्थात दुधारी कातरी त मुंबईची जनता पडलेली आहे.भारतातील मुंबईसारख्या अग्रगण्य पालिकेला, कर व महसूल देऊन जनता अडकलेली आहे. ही एक मुंबईसारख्या जागतिक शहरासाठी शोकांतिका आहे. इतर पालिकांच्या शहरांची ही,अशीच स्थिती असल्यास, संपूर्ण महाराष्ट्रात मॅन होल्स तथा रस्त्यांवर, किती प्रमाणात खड्डे असतील?याची कल्पना तमाम जनतेने करावी. हा एक ढिसाळ काम करण्याचा नमुनाच आहे. महापालिके सारखे चरण्याचे कुरण कुठेच नाही किंवा राज्यात कोणतेही स्वार्थी खाते नाही. जनतेला या शब्दाचा अर्थ कळलाच असेल.कारण येथे पैसे दाबल्या शिवाय,पानावर चं वजन ठेवल्याशिवाय ते पान पुढे हलत नाही. हा जनतेचा अनुभव आहे. आपण जेव्हा महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करतो, काय त्या खात्याची अवस्था!जुन्या पानांचा पडलेला खाच, त्यावर धुळीचे साम्राज्य असते, साफसफाई बिलकुल नसते. काय ते कर्मचारी त्यांचे पडलेले चेहरे, काय ते अधिकारी? कोणतेही काम कठीण कसे करता येईल, हेच लोकांना पालिका कर्मचाऱ्यांनी सांगायचे व नाना चा पाढा वाचायचा!आपल्या कामाबद्दल वरिष्ठांना भेटायचे झाल्यास, साहेब रजेवर आहेत,साहेब मिटींगला आहेत, असे शिपाई सांगणार. मग ह्या कामांत कंत्राटदार व तत्सम खात्यामध्ये लाखोंचा व्यवहार होऊन, त्यामध्ये स्वार्थ जपला जातो. हे जग जाहीर आहे.कारण लाज घेताना अनेक अधिकारी, कर्मचारी रंगे हाथ पकडले गेलेले आहेत. लोकांचं म्हणणं आहे!आपण स्वार्थ जपा, पण जनतेची कामे प्रामाणिकपणे करा. राखी तो तळे चाखी!ही म्हण सगळ्यांना ज्ञात आहे.जनता तुम्हाला कर व महसूल भरपूर भरते.त्यांच्या जीवाशी असे खेळू नका!आपण पावसापूर्वी केलेल्या, अर्धवट कामाने मॅन होल तसेच राहतात.नाले व गटारे सफाई झाल्यावर, कचरा आपण शेजारी ठेवता? तो पुन्हा सूकून अथवा पाण्याने आत पडतो,मग नाले गटारे साफसफाई,ह्याचा काय उपयोग? कामात दिरंगाई झाल्याने मॅन हॉल तयार होतात, पाण्याखाली असलेले मॅन होल्स लोकांना कळत नाहीत व अपघात होतात. तसेच रस्त्याचे काम करताना. हलके, निकृष्ट सामान व साहित्य वापरल्याने,रस्त्यांना पावसाच्या पाण्यामुळे खड्डे पडतात.डांबर व खडी वाहून जाते. मग रस्त्यात खड्डे की खड्डे रस्त्यात परिस्थिती होते. ह्या सगळ्या गोष्टी महापालिका आयुक्तांना माहित नाही का? सगळ्या गोष्टी माहीत असतात! पण सगळ्या गोष्टी वळत नाहीत. कुचकामी यंत्रणा! आहे.म्हणून जनतेला, न्यायालयाकडे जावे लागते.ही एक शोकांतिका आहे. तर शासन व प्रशासन योग्य कामे करीत नाहीत हे जनतेचे दुःख आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *