
प्रतिनिधी :सुरेश बोरले
अलिबाग ते रेवदंडा जाण्याचा योग आला.मी रेवदंडा बसच्या शोधामध्ये आठ दिवस होतो.
परंतु मला काही कुठे संपर्क करता आला नाही. मी राहतो गोरेगावला त्यामुळे मला बोरवली(पूर्व) नेनसी कॉलनी डेपो, हा मला एसटी बस मध्ये बसायला बरा पडेल, म्हणून मी त्या ठिकाणी गेलो असता, एसटीचे वेळापत्रक पाहिले. त्यामध्ये कोकणात जाणाऱ्या गाड्या अतिशय कमी होत्या, विशेष करून अलिबाग विभागाच्या रेवदंडा ह्या परिसरासाठी.मला वाटले सकाळपासून दुपारपर्यंत तीन ते चार गाड्या असाव्यात?परंतु दुपारची, तीन वाजताची गाडी फक्त मला वेळा पत्रकावरती दिसली.मला माहित होते की, अलिबाग पासून आपण पुढे गेलो तर मुरुड पर्यंत, हा एकच पट्टा पडतो. फक्त एकच गाडी! का? माझ्या मनामध्ये प्रश्न आला. म्हणून मी त्या गाडीचे बुकिंग केले आणि दुसऱ्याच दिवशी मी ती गाडी पकडली. पण नवीन मुंबई पासुन गाडी भरतच गेली. गाडीने जसं पनवेल सोडलं, तशी ती गाडी अतिशय गच्च भरलेली. ज्याप्रमाणे लोकल ट्रेन पॅसेंजर असते, त्याप्रमाणे, ही रेवदंडा गाडी प्रत्येक स्टेशनला थांबायची. प्रत्येक गावे घेत, गाडी अलिबाग डेपोला आली,तरी माणसांची गर्दी काय कमी होत नव्हती. जेवढी माणसं उतरायची, तेवढीच जास्त प्रमाणात माणसं पुन्हा गाडी चढायची. लोकांची गर्दी काय कमी होत नव्हती. सगळ्यांना त्रास व्हायचा. लोकांना मनस्ताप होईल, असा प्रकार पाहून मला अतिशय वाईट वाटले. खरं म्हटलं तर एकच बस असल्यामुळे, लोकांची धांदल उडते. लग्न सराई आहे, लोकांची शेतीची काम आहेत.लोकांना बाजारपेठ करायची असते किंवा लोकांना काही वस्तू घ्यायच्या असलयास तालुक्याला जावे लागते. त्यामुळे या गाडीमध्ये कदाचित गर्दी होत असेल. नाहीतर रेवदंडा गाडीचा मार्ग हा वेगळा असावा, एकच गाडी असल्याने, गर्दी होत असावी असा कयास लागतो.एसटी महामंडळाला आम्ही येथे विनंती करतोय की रेवदंडा विभाग, हा थोडासा एका बाजूस पडतो. त्यामुळे कदाचित हे होत असावे. कारण अलिबाग रेवदंडा गाडी अलिबाग करून पुढे जाते आणि गावागावातून जात असल्यामुळे गाडीच्या मार्गामध्ये अतिशय अडथळे येतात आणि त्याचा त्रास प्रवाशांना होतो. याची आवर्जून नोंद एसटी महामंडळ घ्यावी.परत जर प्रत्येक दिवसाला दोन-तीन गाड्या मंडळाने सोडल्या, तर कदाचित! प्रवास्यांचा जो ओघ आहे किंवा प्रवासाची झुंबड आहे ती कमी होऊ शकते.एकच गाडी असल्यामुळे हा दुष्परिणाम होत आहे. मला तर वाटते,रेवदंडा गाड्या या तीन ते चार सोडल्या तरी एसटी प्रशासनाला याचा फायदाच होईल! उत्पन्न वाढेल. कारण त्या पट्ट्यामध्ये बरीचशी लोक मी पाहिली ही स्थानिक लोक आहेत, जास्त ये जा करतात.त्यामुळे शेवट पर्यंत लोकांची गर्दी होते. वरील कारणास्तव एसटी प्रशासनाला पुन्हा विनंती आहे की,त्यांनी दिवसातून दोन ते तीन गाड्या सोडल्याने नुकसान कोठेही होणार नाही.ह्याची खात्री आहे.