मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढी निवडणूकीत उबाठा ला घवघवीत यश..

Share

प्रतिनिधी : मिलन शहा

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढी निवडणूकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या विजयी उमेदवारांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. उद्धवसाहेबांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, कार्याध्यक्ष बबन शिरोडकर, सरचिटणीस सूर्यकांत शिंदे, खजिनदार अजित झाझम, सहकार्याध्यक्ष किशोर घाडी, अमोल म्हात्रे आदी पदाधिकारी तसेच विजयात मोलाचा वाटा उचललेले पदाधिकारी, सेवानिवृत्त पदाधिकारी उपस्थित होते.


Share

2 thoughts on “मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढी निवडणूकीत उबाठा ला घवघवीत यश..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *