
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबईचा लॉस एंजेलिस किंवा टोकयो. बनवायचा विचार,सरकारचा दिसत आहे.मोठया दिमाखात मुंबईत मेट्रो सुरू झाली.रस्त्यांच्या वरुन हवेत रुळावरुन एसित बसून, आरामात प्रवास करायचा.पण त्या रुला खालची किंवा त्या मेट्रो स्टेशन खालच्या रस्त्यांनची दुरवस्था आज भयानक आहे,ती पहायची नाही.मोठे मोठे खड्डे,सुकलेले सिमेंटचे डोंगर,खड्डे व्यवस्थित न भरलेले, ह्याची मेट्रोच्या कंत्राटदारांनी, दखल घेतलेली दिसत नाही.आपण गुंदवली ते बोरिवली पर्यंत मेट्रो स्टेशन खाली असणाऱ्या रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. या खड्ड्या मूळे वाहंनांची वाट लागतेच पण खास करून दुचाकी स्वारानची अवस्था वाईट होते. कमरेला हादरे बसतात.त्याने मणक्याचे विकार होतात.दर रोज गुंदवली मेट्रो फलाटा खालून प्रवास करताना ,खालून जाताना,मुंबई पुणे लोहमार्गाचे भोगदे आठवतात.इतका काळाकुट्ट अंधार दिवसाही येथे असतो.पुढचे खड्डे व वाहन दिसतच नाहीत.संध्याकाळी दिवे लावल्यावर हीच परिस्थिती थेंट बिसलेरी नाक्या पर्यंत असते.ही मेट्रो फलाटे म्हणजे, पुढचे पाठ मागचे सपाट अशी आहे!महानगर पालिका,सार्वजनिक बांधकाम विभाग व मेट्रो व्यवस्थापनाने, ही अवस्था पहावी.रस्त्यांची झालेली दुरवस्था त्वरित रस्ते दुरुस्त करून चांगली करावी.जेणे करून वाहन व चालकांना दिलासा मिळेल. मेट्रोने हवेतून प्रवास करणाऱ्यांना सोय झाली गारेगार प्रवासाची मात्र पण जे फलाटा खालून,आपल्या वाहंनानी प्रवास करतात,त्यांचा प्रवास कधी सुखद होणार?
MMRDA आणि मुंबई महानगर पालिके ने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे