मूर्ती लहान पण कीर्ती महान असे होते हास्य कलाकार “मुखरी”…

Share

File Photo

प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,जगात अशी म्हण आहे की मूर्ती छोटी पण किती मोठी,अशी बरीचशी उदाहरणे आहेत खास करून, क्रीडा विश्वात,सुनील गावस्कर,सचिन तेंडुलकर, तर कला क्षेत्रात,सचिन पिळगावकर व्यक्ती आपल्या क्षेत्रात माहिर आहेत. अशीच एक व्यक्ती वामन मूर्ती,हिंदी चित्रपट जगतामध्ये आपलं नशिब अजमवायला मुंबईला आली, कलाकार नाटा असल्याने,त्याला पाहताच प्रेक्षकांना हसु येई.त्यामध्ये त्याचा गोल गप्पा चेहरा व दात न दाखवता, हास्या सोबत संवादाची फेक, आणि संवाद बोलण्याची वेळ ही वाखण्यासारखी होती. अगदी दुग्ध शर्करा योग! असे.त्यामुळे हा हास्य कलाकार, चित्रपटात विनोद करणारा हा नट आपल्या अभिनय कलाकारी मुळे सगळ्यांच्या लक्षात राहिला. त्याचा हलका फुलका विनोद असायचा,तो मनाला गुदगुल्या करून जायचा. यानी 1945 मध्ये प्रतिमा चित्रपटात आपल्या कला कार्याचा श्री गणेशा केला. ह्या कलाकाराने दक्षिणे मधील अनेक चित्रपटात ही कामे केली.पण विशेष चित्रपटात त्याने रोचक भूमिका केल्या, त्या प्रेक्षकांना लक्षात राहणारे चित्रपट काही असे आहेत,1957 मदर इंडिया, 196 कोहिनूर,1967फर्ज,1768 बॉम्बे टू गोवा,1972गोपी 1975 अमर अकबर अँथनी, 1981 लावारिस, 1983 कुली अशा हाउसफुल चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यांनी अभिनय केलेल्या, 1984 मध्ये शराबी चित्रपटांमध्ये मुचे होतो, नथुलाल जैसी! तुम्हाला हा शब्द तुम्हाला आठवला की! कळेल हा अवलिया कलाकार, म्हणजेच स्वर्गीय मुक्री साहेब. अलिबागच्या उरण येथे,
5 जानेवारी 1922 मध्ये त्यांचा जन्म झाला.ते कोकणी मुसलमान होते. पहिल्या चित्रपटात स्वर्गीय. युसुफ खान अर्थातच नटवरय दिलीप कुमार, यांच्याबरोबर त्यांनी त्याना संधी मिळाली. ते दोघे शाळेतील वर्ग मित्र होते. त्यामुळे त्यांची गट्टी जमली व दिलीप साहेबांच्या अनेक चित्रपटात मुखरी हे नेहमीच दिसले. एकही आपला दात न दाखवणारा कलाकार, फक्त गालातल्या गालात प्रेक्षकांना हसवणारा कलाकार, म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या हिंदुस्तानी फिल्मी जगतात,त्यांनी त्याकाळच्या सगळ्याच कलाकारां बरोबर कामे केलेली आहेत.सगळ्या मुख्य नटांना सहाय्यक हास्य अभिनेता लागायचा, त्यासाठी ते लोकप्रिय होते. त्या करिता ते मशहूर हास्य कलाकार फिल्मी जगतात होते. मोठ्या हास्य अभिनेता बरोबर त्या मध्ये स्व. मेहमूद, स्वर्गीय, बद्रुद्दीन काझी अर्थात जॉनी वॉकर स्वर्गीय. गोप,एवढ्या मोठ्या हास्य अभिनय सम्राट्टा बरोबर काम करणे करणे त्यावेळी एक आव्हान होते,ते त्यांनी सहज पार पाडले. लहानपणी त्यांना अभिनयाची आवड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. अनेक स्थानिक स्तरावर त्यांनी छोटी-मोठी कामे केली. त्यामध्ये दिलीप कुमार हे त्यांचे शाळेचे सवंगडी होते. ते मुंबईला आधीच अभिनय क्षेत्रात होते.त्यांच्या संगीतीने ते मुंबईला, अभिनय क्षेत्रात आपलं नशीब अजमावायला आले. ते यशस्वी झाले.म्हणून त्यांचे संबंध स्वर्गीय. दिलीप कुमार व सायरा बानो यांच्याशी शेवटपर्यंत चांगले राहिले. तसेच स्वर्गीय. सुनील दत्त ही त्यांच्याकडे येत जात असत.साधारणपणे 25 वर्षांपूर्वी, मी बी एस इ एस ली. या आस्थापनात सेवेला होतो, त्यावेळी ते आमच्या खात्यामध्ये आले होते. मी त्यांना आपल्या टेबलाजवळ घेऊन आलो. त्यांना बसायला दिल, त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता. नंतर त्यांना आपल्या साहेबांकडे घेऊन गेलो व त्यांचे काम केले. त्यांनी मला शुभ आशीर्वाद दिले. 600 पेक्षा अधिक चित्रपट त्यांनी कामे केलेली आहेत. ते लोकांच्या मनात घर करून राहिले आहेत. प्रेक्षकांना तुम्ही लवकर रडू शकता पण हसू शकत नाही! ती एक जबरदस्त कला आहे. त्यामुळे त्यांनी हिंदुस्तानी, प्रेक्षकांसाठी केलेली ही सेवा बरीच मोठी आहे. त्यांनी केलेल्या मोठ्या उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांना आमचा मनापासून सलाम.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *