मॅंग्रोव्ह वाचवण्यासाठी मुंबईकरांचे धरने प्रदर्शन..

Share

एसएमएस-प्रतिनिधी – वैशाली महाडिक

मुंबई : वर्सोवा–दहिसर कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत मालाड क्रीक परिसरातील सुमारे ६० हजारांपैकी ४५,६७५ मॅंग्रोव्ह (सुमारे ७५ टक्के) बाधित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता 

 सेक्टर ८, टारझन पॉइंट, चारकोप, कांदिवली पश्चिम येथे शांततापूर्ण धरना प्रदर्शन  करण्यात आले . आंदोलकांच्या नुसार सेक्टर ८ चारकोप, गोराई डंप यार्ड, एकसर गोराई तसेच दहिसर परिसरातील मॅंग्रोव्ह क्षेत्र यामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे.

मॅंग्रोव्ह हे मुंबईसाठी नैसर्गिक संरक्षक कवच मानले जाते. पूर, चक्रीवादळ, समुद्री वादळे तसेच सुनामीसारख्या आपत्तींपासून शहराचे संरक्षण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. दरवर्षी समुद्राची पातळी सुमारे ४.५ मिमीने वाढत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तसेच मॅंग्रोव्ह हे उष्णकटिबंधीय जंगलांच्या तुलनेत ३ ते ५ पट अधिक कार्बन साठवून ठेवतात. त्यामुळे त्यांची तोड झाल्यास मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होऊन जागतिक तापमानवाढ अधिक वेगाने होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

नागरिक, विद्यार्थी, कुटुंबीय आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने  उपस्थित होते. मुंबईच्या नैसर्गिक संरक्षणासाठी आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन आंदोलकांनी मुंबईकरांना केले आहे. 


Share

One thought on “मॅंग्रोव्ह वाचवण्यासाठी मुंबईकरांचे धरने प्रदर्शन..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *