प्रतिनिधी : मिलन शहा
भिवंडी : भिवंडीतील नारपोली पोलिस ठाण्याजवळ बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पुलावरून लोखंडी रॉड पडल्याने मोठा अपघात झाला. हा जड रॉड चालत्या ऑटोरिक्षावर पडला, ज्यामुळे ऑटोमध्ये बसलेल्या एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे .
प्रत्यक्षदर्शींनी तातडीने जखमीला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेमुळे मेट्रो बांधकामाच्या कामात निष्काळजीपणा बाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या अभावावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.
Very serious incident railways should enquire and punish .