
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मालाड मधील वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ती मेरी चेट्टी यांना पितृ शोक. मालाड काचपाडा राष्ट्र सेवादल, अध्यक्षा व सफल विकास वेलफेअर सोसायटी मुंबई, अध्यक्षा आरोक्या मेरी चेट्टी यांचे वडील ऍंथोनी चेट्टी यांचे वयाच्या 68व्या वर्षी दीर्गाजाराने दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान मालाड मधील राहत्या घरी निधन झाला. त्यांच्या जाण्याने परिसरातील हळ व्यक्त होत आहे.मागील काही वर्षांपासून ते कर्क रोगाने ग्रस्त होते. त्यांच्या पश्चात मुलगा शक्ती, मुली आरोक्या मेरी, जस्सी, मरसीना व जावई, सून, नातवंड असा भला मोठा परिवार आहे. त्यांच्या अंतिम दर्शना साठी अनेक सामाजिक तसेच विविध पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.त्यांचे अंतिम क्रिया ख्रिस्ती धर्मानुसार मार्वे रोड ख्रिस्ती दफन भूमी येथे करण्यात आली.