मोहम्मद रफी सोनेरी कंठाचा गायक!

Share

File Photo

प्रतिनिधी :सुरेश बोरले

भारतीय फिल्मी दुनियेतील स्तंभा पैकी एक महत्त्वाचा स्तंभ! म्हणजे स्वर्गीय, मोहम्मद रफी साहेब!एक प्रख्यात गायक एक प्रशिक्षित शास्त्रीय संगीत गायक.ज्यांनी चार दशके, आपला सुरेल आवाज!हिंदी सिने जगताला दिला. कित्येक नटांचे चित्रपट चालण्यासाठी ,रफी साहेबांचा मोठा हात होता.कांहीं तर त्यांच्याच,उधारी आवाजाने चित्रपट उद्योगात मोठे झाले. असे अष्टपैलू गायक.त्यांनी या क्षेत्रात,सगळ्या प्रकारची गाणी अनेक भाषांमध्ये गायली.ती प्रसिद्ध ही झाली आणि चाहत्यांनी भर भरून प्रशंसा ही केली तसेच ते चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले हे विशेष. मोहम्मद रफी यांचा जन्म 24डिसेंबर,1924साली कोटला सुलतानपूर अमृतसर पंजाब राज्यात झाला. तत्पूर्वी त्यांचे कुटुंब ब्रिटिश कालीन,पाकिस्तानच्या लाहोर येथे स्थायिक होते.त्यांच्या वडिलांचे नाव हाजी अली मोहम्मद,आईचे नाव अल्ला रखी बाई, तर दोन भाऊ होते मोहम्मद दीन,हमीद भाई त्यांच्या गावात सकाळी एक फकीर गाणे गात त्यांच्या दारावरुन जात असे, त्यांच्या मागे नन्हे रफी साहेब, त्यांच्या आवाजाच्या जादूने, लांब पर्यंत त्यांच्या मागे जायचे. ही बाब त्यांचे वरिष्ठ बंधू हमीद भाई यांच्या लक्षात आली. त्यांनीच रफी साहेबांची गाण्याची रुची पाहून, त्यांनी संगीत शिकण्यासाठी,स्वर्गीय,गुलाम अली खान यांच्याकडे तालमी साठी पाठवले, त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे येथे प्रथम त्यांच्याकडे गिरवले. त्यावेळेस पाकिस्तानातील लाहोर या शहरात,एका हॉलमध्ये, स्वर्गीय, कुंदनलाल सहगल!त्यावेळचे फिल्म जगतातील अग्रगण्य नाव! त्यांच्या कार्यक्रम होता. छोटे रफी साहेब सेहगलाना पाहण्यासाठी आतुर होते. कुंदनलाल सेहगलजी, त्या कार्यक्रमात वेळेवर येऊ शकले नाहीत,पण वेळ निघून चालली होती. हॉलमध्ये बरीच गर्दी जमली होती.प्रेक्षक निराश होत चालले होते. मग हमीद भाईंनी त्या कार्यक्रमाच्या स्टेजवर, छोट्या!तेरा वर्षाच्या रफी साहेबांना, गाण्यासाठी पाठवले, रफी साहेबांनी,आपल्या आवाजाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. दरम्यान,तेव्हा सेहगल जी! हे सुद्धा हॉलमध्ये उपस्थित होते. एका ठिकाणी गुपचूप उभे राहून त्यांनी रफी साहेबांचा आवाज ऐकला. रफी साहेबांचे गाणे संपल्यावर, सेहेगल साहेबांनी, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला व मुंबईला येण्याचे आमंत्रणही दिले. रफी साहेबांनी, आपली तालीम चालू ठेवली आपला संगीत व गायकीचा पाया मजबूत केला.स्वर्गीय पंडित जीवनलाल मठ्ठू यांच्याकडे हिंदुस्तानी, संगीत शिकले. नंतर किराणा घराणा अब्दुल वाहिद खान यांच्या कडे , नंतर उस्ताद बडे गुलाम अली खान, पटियाला घराण्याचे फिरोज निजामी खान जे लाहोर ऑल इंडिया साठी कार्यक्रम करायचे,तर रफी साहेब कुंदनलाल सेहगल व जी एम दुराणी यांचे चाहते होते. 1941 ला त्यांना पहिलं द्वद्वव गीत झीनत बेगम, यांच्यासोबत पंजाबी चित्रपटात, “गुलाब लोच” साठी गाण्याची संधी मिळाली. मग 1944 झाली रफी साहेब मुंबईला आले. त्यांचे मित्र तनवीर नाकवी! यांच्या प्रयत्नाने 1944 साली “गाव की गोरी” साठी हिंदी फिल्मी दुनियेत त्यांनी प्रवेश प्रवेश केला आणि नंतर त्यांनी स्वर्गीय,नौशाद साहेबांबरोबर 1950 ते 1960 पर्यंत सुंदर गाणी गायली. शामसुंदर बरोबरी ही त्यांनी काम केले. गाण्यांच्या चित्रपटांची यादी इथे देता येत नाही कारण लिहिण्यास मर्यादा आहे. रफी साहेबांनी इंग्रजी,हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, तेलगू, ओडिया, मिथाई,भोजपुरी अशा अनेक भारतीय भाषांमध्ये, ,परदेशी भाषांमधील अशी एकूण 25 हजाराहून अधिक गाणी गायलेली आहेत.त्यांच्या नावाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंद आहे, हा एक विक्रम आहे. त्यांनी कधीच पैशासाठी गाणी गायली नाहीत.फक्त कलेच्या माध्यमातून आपले मानधन घेतले ते मानधन जास्त असल्यास त्यांनी ते परतही केले!असा हा पहिल फिल्मी जगतातील गायक कलाकार होता.स्वर्गीय, रफी साहेब अगदी सुमधुर व शांत स्वभावाचे होते. सगळ्यांशी संबंध जिव्हाळ्याचे, कुणाशी वैर नाही,की कुणाशी भांडण नाही. संगीत तथा गायन कलेवर, निस्सीम प्रेम करायचे. शेवटपर्यंत त्यांनी हे केले.रोज सकाळीच पेटीव व सतारी सहित, आपल्या सरावाला बसायचे, हे काम त्यांनी शेवटपर्यंत केले.सुरवातीला ह्या जगतात ते नट म्हणूनही वावरले. तेथे काय टिकाव लागला नाही. मग त्यांनी आपला मोर्चा गाण्याकडे वळवला.चित्रपटात गाण्या पूरवी, ते कोणत्या नटावर गाणे चित्रित होणार आहे,तसेच त्या गाण्याची अवस्था काय आहे? याचा अभ्यास त्या कलाकाराच्या लकबीने करायचे, चित्रपटांमध्ये तोच नट आपल्या स्वतःच्या आवाजाने गातो आहे,असा पक्का भास प्रेक्षकांना, व्हायचा.ही एक कला त्यांना देवाची देणगी म्हणून होती. मग तो कलाकार, पडद्या वरती कोणत्याही अवस्थेत असो, तोच गीत गात आहे, असे लोकांना वाटायचे.यामध्ये रफी साहेबांचा हातखंडा होता. स्वर्गीय,रफी साहेबांनी 1950ते 1970पर्यंत, सर्वच आघाडीवर असलेल्या कलाकारांसाठी,आपला आवाज पेश केलेला आहे. त्यामध्ये लोकप्रिय कलाकार होते स्वर्गीय, देव आनंद, दिलीप कुमार.राज कुमार,राज कपूर.राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी, विश्वजीत, सुनील दत्त, प्रदीप कुमार,भारत भूषण, देव कुमार,सुधीर,फिरोज खान, खान,संजय खान आदींसाठी गायले.नंतरच्या काळात, धर्मेंद्र, जितेंद्र, स्वर्गीय,ऋषी कपूर, अमिताभ बच्चन ते मिथुन चक्रवर्ती यांच्या पिढी पर्यंत पार्श्वगायन केलेले आहे.तसेच प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या साठी ही त्यांनी गाणं गायले आहे.तर त्याकाळच्या,त्याच्या सोबत असणारे लोकप्रिय पार्श्वगायक,स्वर्गीय,मुकेश ,किशोर कुमार, मन्ना डे, तलत मेहमूद, त्यांच्या बरोबरी त्यांनी अनेक सुंदर गाणी गायलेली आहेत.तर द्वनद्व गीते गाताना, त्यांनी स्वर्गीय,लतादीदी,आशा भोसले, हेमलता, सूरय्या,गीता दत्त, बेगम अख्तर, नुरजहा,शमशाद बेगम,सुरय्या, अलका यागनिक,शकीला,सुमन कल्याणपुर सारख्या एकापेक्षा एक महिला गायीका बरोबर गीते पेश केली, ती आजही गाणी अजरामर आहेत. तर त्यावेळच्या गीतकारांन मध्ये सर्वश्री.मजरुह
सुलतानपूरी.असत भोपाली, व्यास,योगेश ,गुलशन बावरा, जानीसर अख्तर,आनंद बक्षी,इंदिवर,हसरत जयपुरी राजेंद्र कृष्ण,गुलजार अशा मातबरांनी लिहिलेल्या गाण्यावर,रफी साहेबांनी यशस्वी गीते गायलेली आहेत,ती आजही लोकप्रिय आहेत. तर त्या काळच्या गाजलेल्या संगीतकारां मध्ये, सर्वश्री. नौशाद,एस.डी बर्मन,श्यामसुंदर,कल्याणजी आनंदजी, श्रीकांत ठाकरे, ओ.पी. नय्यर,मदन मोहन,एन.दत्ता गुलाम अहमद, हंसराज बहल, हंसराज भगतलाल,जयदेव, सलील चौधरी, ख्य्याम, मदन मोहन,नुसरत फतेह अली,पंकज मलिक, प्रेम धवन,रणजीत बारोट, आर.डी.बर्मन सोबत काम केलेलं आहे.तर शंकर जयकिशन यांच्या समवेत त्यांनी 341 गाणी गायलेली आहेत त्यामध्ये 216गाणी ही तर सोलो आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल हे त्यांचे आवडते संगीतकार होते. त्यांच्यासोबत त्यांनी जवळ जवळ 370 गाणी गायलेली आहेत, हिंदी फिल्मी जगतातील जास्तीत जास्त रफीन ची,गाणी संगीतबद्ध केलेली ही संगीतकार जोडी आहे. स्वर्गीय, रफी साहेबांना मिळालेली पारितोषिक! राष्ट्रीय फिल्म पारितोषिक , फिल्म फेअर पारितोषिके6, बंगाल जर्नलिस्ट पारितोषिक 3,व इतर 4,तर1967 साली भारत सरकारने पद्मश्रीने त्यांचा गौरव केलेला आहे. एवढी मोठी कामगिरी करणं भारतीय फिल्म दुनियेत कोणाला जमलेले नाही, ती रफी साहेबांनी करून ठेवलेली आहे. शेवटच्या उत्तरार्धात त्यांनी लक्ष्मी प्यारे बरोबर शेवटचं गीत ध्वनिमुद्रित केलं होतं. दोन्ही ध्वनिमुद्रण संपताच, त्यांनी संध्याकाळी लक्ष्मीकांत जीना सांगितल मै निकलता हु! आणि लक्ष्मीकांत जिनेही,त्यांच्याकडे विशेष वेगळ्या नजरेने पाहिलं. कारण असे कधी रफी साहेब त्यांच्याशी बोलले नव्हते.पण दुसऱ्या दिवशी 30 जुलै,1980 रोजी, वर्तमानपत्रात बातमी आली की, प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रफी मेन्शन येथे, राहत्या घरीच निधन झाले. त्यांच्या चाहत्यांच्या मनाचा बांध फुटला, हजारो चाहते,साश्रू नयनांनी,त्यांच्या जनाज्यात,त्यांना शेवटची आदरांजली वाहण्यासाठी, सांताक्रुज येथील कब्रस्तानापर्यंत पोहोचले होते! स्वर्गीय,रफिंसारखा, पुन्हा होणे नाही.त्यांनी आपल्या जीवनात बराच पडता काळही पाहिला,परंतु ते डगमगले नाहीत,ते पुन्हा उभे राहिले! शेवटी जाताना ते सांगू गेले,मेरा सुंना साज..तराना ढूंढेगा,तिर निशाने तीर निशाने नाज फसाना ढूंढेगा..,मुजको मेरे बाद जमाना ढूंढेगा! त्यांनी केलेल्या ह्या निस्सीम कलेच्या सेवेसाठी,मनापासन, त्यांना कुर्निसात!💐💐💐💐💐🙏


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *