प्रतिनिधी :कांचन जांबोटी
मुंबई,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे जीवन, कार्य आणि विचार यांचे साहित्य प्रदर्शन शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर (पूर्व)येथील सुरेंद्र गावसकर सभागृहात आयजित करण्यात आले आहे.
डाॅ. बाबासाहेब हे साक्षात प्रज्ञासूर्य. अर्थशास्त्र,समाजशास्र,राज्यशास्र व इतरहीअनेक ज्ञानशाखांमध्ये त्यांनी मोलाची भर घातली.समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ,पत्रकार,संसदपटू,राजकीय मुत्सद्दी, सांस्कृतिक ऐक्याचे पुरस्कर्ते ,आत्यंतिक ग्रंथप्रेमी, बौद्धधम्मचक्रप्रवर्तकआणि अर्थातच भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणून इतिहासावर त्यांनी आगळावेगळा ठसा उमटवला. ते सर्वार्थाने राष्ट्रीय नेते होते.
या त्यांच्या सर्व पैलूंचे दर्शन या समग्र साहित्यातून रसिकांना घडविण्यासाठी हे अनोखे प्रदर्शन दिनांक ६ते८डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 7या वेळेत
सर्वांना पाहता येईल असे संदर्भ कार्यवाह उमा नाबर यांनी कळवले आहे.
तसेच ग्रंथ संग्रहालयाच्या आवारात वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध विषयांवरील ग्रंथविक्रीची सोय करण्यात आली असून त्याचा लाभ प्रकाशक व वाचकांनी घ्यावा असे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी आवाहन केले आहे.