प्रतिनिधी:सुरेश बोरले
सद्या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे! महाराष्ट्राचे राजकारण कुठे चाललय?पुन्हा पोलीस अपयशी होताहेत. सिंधुुर्गनगरीत काल कलगीतुरा पहायला मिळाला.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नुकताच राजकोट गडावर, आपोआप जमीनदोस्त झाला.पण येथे हे प्रकरण राहिले बाजूला. दोन नेते मंडळी!ह्या गडावर आमने सामने आली.
तीम्हणजे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे व
भाजपा,खासदार नारायण राणे! युवा नेते आले होते,पुतळा जमीनदोस्त झाला,त्याचा निषेध करायला.तर राणे आले होते पाहणी करायला.पण पोलिसांना दोन्ही नेते एकत्र एकाच दिवशी येणार हे माहीत होत,मग राडा हा होणारच?मग तेवढा बंदोबस्त करायला नको होता का?पोलिसांचा फौजफाटा नको का मागवायला? बालबुध्दी पोलिसी वृत्ती आहे.हे दोन्ही नेते येणार,त्यासाठी जाण्या येणाच्या वाटा वेगळ्या नको का करायला? मध्यस्थीसाठी जयंत पाटील व इतर काँग्रेसी नेतेही होते, तेच पोलिसानं बरोबर समेट करीत होते?असो!एकंदरीत परिस्थिती पाहता मराठी माणसांची आजची अशी स्थिती आहे,तर इतर जातीय ही मजा पाहून खुश होत आहेत. भूमिपुत्रांनसाठी लढा देणाऱ्या ह्या पक्षाची वाताहत होताना दुःख होत आहे.कारण दोघे नेते आले आहेत! महाराजांच्या पुतळ्या साठी पण घडले वेगळच!फितुरी,आपसात लढणे,छत्रपती संभाजी महाराजांचा वध हा इतिहास सगळ्यांना माहीत आहे.तेव्हा “स्वराज्य”होते आता खुर्ची आहे, एवढाच फरक आहे.
दुफळीच्या ह्या खानदानी परंपरेने हिंदुस्थानाला कायम डुबवले आहे.म्हणून मोगलांनी, इंग्रज,पोर्तुगिजांनी व डच लोकांनी शेकडो वर्ष भारतावर राज्य केले.वरील सगळ्यानी
हीच युक्ती वापरली आहे. “दोघांचेभांडण,तिसऱ्याच लाभ” परप्रांतीय व इतर मजा पाहत आहेत.हे महाराष्ट्राचं दुदैव्य!