
एसएमएस-प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई :तब्बल ३७ वर्षांनंतर विद्या निकेतन हायस्कूल, येळवण (ता. राजापूर) मधील १९८८ सालच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची भेट मुंबईतील दादर येथील वीर कोतवाल उद्यानात शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडली. जुनी मैत्री, शालेय आठवणी आणि भावनिक क्षणांनी ही भेट संस्मरणीय ठरली.
विद्यार्थी जीवनातील निखळ हसणं-खेळणं, मस्करी, आणि गावच्या शाळेचा ओला मातीचा सुवास पुन्हा मनात दाटून आला. ग्रामीण, निसर्गरम्य परिसरातील विद्या निकेतन शाळेत घालवलेले दिवस आठवताच सर्वांच्या चेहऱ्यावर जुन्या काळाची ओढ दिसत होती.
या शाळेचे माजी मुख्याध्यापक शिक्षण महर्षी चंद्रकांत ‘भाई’ देशपांडे यांच्या संस्कारांनीच आमचे व्यक्तिमत्त्व घडले, अशी भावना विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी व्यक्त केली. त्यावेळी शिकवणाऱ्या शिक्षकांचे स्मरण करण्यात आले. काही शिक्षक आणि सहाध्यायी आता हयात नसल्याने त्यांना सर्वांनी मूक श्रद्धांजली वाहिली तेव्हा वातावरण क्षणभर भावूक झाले.
बदललेली ओळख, पण कायम तीच मैत्री
काळ पुढे पुढे सरकत असला तरी मैत्रीचे धागे मात्र अजूनही घट्ट असल्याने सर्वांना भेटीत आनंद अनावर झाला.
मुलींचा विवाहानंतर आडनाव बदललं, अनेकांना मुले—नातवंडे झाली, तर मुलगेही व्यावसायिकदृष्ट्या आणि वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले. मात्र, ओळखीचे चेहरे पाहताच सर्व जण पुन्हा शालेय काळात हरवले.
अनुभवांचे आदानप्रदान आणि पुढील सहकार्याची ग्वाही
दीर्घकाळानंतर भेटलेल्या या मित्रमैत्रिणींनी आपापल्या आयुष्याच्या कथा, संघर्ष, यश अनुभव शेअर केले. आयुष्यात काही जणांची परिस्थिती बदलली असून काही जण अजूनही ग्रामीण भागात साध्या जीवनशैलीत आहेत. तरीही सर्वांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची भावना व्यक्त केली.
या भेटीत खालील माजी विद्यार्थी सहभागी झाले:
मंगेश पांचाळ (ग्रामसेवक चिपळूण), हनुमान मालप, चंद्रशेखर जाधव (पत्रकार), विकास लाड, अंजली कामतेकर, सुवर्णा शेट्टे, सुरेखा लाड, सुरेश माटल, वसंत बने, विठोबा पराडकर, अनंत शेट्टे, वामन तानवडे, दीपक रोडे तसेच इतर सहाध्यायी.
या भेटीने जुन्या नात्यांना नवी ऊर्जा मिळाली. “येळवणच्या पर्वणीने पुन्हा एकदा आम्हाला शाळकरी बनवले”, असे अनेकांनी सांगत या भेटीची सांगता स्मरणरंजनाच्या भावनिक वातावरणात झाली.
पुढील वर्षी अधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून पुनर्भेट आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Very nice.
विद्यार्थी भेट, म्हणजे क्षणभरचा विरंगुळा!
‘ शाळा ‘ म्हटली की ती कुठलीही असो, विद्यार्थी घडवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ‘ शाळा ‘ अशाच प्रकारे ” येळवण,विद्या निकेतन शाळेच्या १९८८ ची तुकडीच्या विद्यार्थ्यांची झालेली भावनिक भेट ही एक अविस्मरणीय भेट म्हणावी लागेल.कारण शाळा मग त्याच शाळेत महाविद्यालयीन शिक्षण, हेच शिक्षण पूर्ण झाल्यावर भविष्याचा मार्ग अगदी योग्यरित्या निवडणे त्यानंतर दोनाचे चार हात,मग मुलं, नातवंडे? नंतर अशाच एक ठरवलेल्या भेटीत शालेय जीवनातील दिसणारे ओळखीचे चेहरे पाहून झालेली भेट!.. त्यामुळे काही क्षणभर का होईना सदरची भेट ही भावनिक ठरली असे म्हटले तरी काही वावगं ठरणार नाही…
Good to meet oldy friends