
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,ईश्वराने प्रत्येक मानवी शरीराची रचना वेग वेगळी केलेली आहे.त्यामुळे प्रत्येकाची हालचाल व सवयी वेग वेगळ्या असतात.त्यांच्या अंगाचे कलागुणही वेगळे असतात.कोणतीही कला आत्मसात,करायला मेहनत व कष्ट लागतात.मग अनेक वर्षांनी त्या कलेत ते पारंगत होतात.पण देवाची उपजत देणगी,जनमताच मिळणे व त्याचे सोने होणे ही एक मोठी किमया देवाची आहे.असे अनेक किस्से आहेत.दैवी शक्ती व आपली मेहनत,ह्या जोरावर तो मार्गक्रमण करतो आणि यशस्वी होतो.अशीच एक व्यक्ती!भारतीय फिल्मी दुनियेत होती.ती व्यक्ती म्हणजे अर्थात! स्व.किशोर कुमार! वर दिलेले देणगी व गुण यांच्यात होते.गायन कलेसाठी कोणत्याच उस्ताद कडे कधी तालमीला गले नाहीत की,शास्त्रीय संगीताचे धडे कधीच गिरवले नाहीत,पण गायनाच्या कलेत!एक अवलिया, मस्तीखोर,मजेशीर, धडपड्या गायक कलाकार!मिळालेल्या,दैवी शक्तीच्या जोरावर, समकालीन गायकांच्या सोबत टिकला व तरनगला है विशेष.आजही आपल्या अविट गाण्याच्या रूपाने,आजही रसिकांच्या मनात ते जिवंत आहेत.त्यांचं टोपण नाव “कीशोरदा”.त्यांचा जन्म4ऑगस्ट,1921 साली मध्य प्रदेश खंडवा येथे झाला.मूळचे ते बंगाली कुटुंबीय,त्यांचे वडील वकील होते.त्यांचे मूळ नाव आभास कुमार गांगुली.परंतु कालांतराने किशोर कुमार झाले.ते उत्कृष्ठ पार्श्व गायक तर होतेच पण स्वतः फिल्म निर्माते,दिग्दर्शक,गीतकार,
संगीतकार,पटकथाकार व स्वतः मनोरंजक नटही होते.चुलबुले कलाकारही होते.अस हे अष्टपैलू व्यक्तिम्त्व होते.1944साली त्यांना “जिद्दी”ह्या चित्रपटात पहिली गाण्याची संधी मिळाली.1970 नंतर त्यांचा सुवर्णकाळ सुरू झालं तो शेवट पर्यंत.कांहीं सुपर स्टार ते अँग्रीमन सारख्या कलाकारांना,त्यांनी शिखरावर नेऊन ठेवले!हे विशेष.त्यांचा भारतीय सिनेमासृष्ठी सुवरणकाळ करण्यात ,मोठा वाटा आहे. “योडलिंग”ही त्यांची गाण्याची,विशेष शैली,ही कोणाकडेच नव्हती.कांहीं परदेशीय योडलींग कलाकारांची त्यांचवर छाप पडली होती.हा प्रकार भारतीय सिनेमात,प्रथम आणण्याचा मान त्यांनाच आहे.जो कोणत्याही गायकला जमला नाही.गाताना वेग वेगळया लहरी व वेग वेगळे आवाज विचित्र पण मनाला सुखावणारे! ह्याचा सर्रास उपयोग ते गाण्यात करायचे.ह्या याडलिंग द्वारे त्यानी अनेकांचे मनोरंजन केले.त्यानी हिंदीत गाणी तर गायलीच,पण बंगाली,माराठी,आसामी,गुजराथी कन्नड,भोजपुरी,मल्याळम,
ओडिया आणि उर्दू भाषेतही गाणी गायलेली आहेत.त्यांचा एक संचही आहे.त्यांना 8 फिल्म फेअर पारितोषिक मिळालेली आहेत,हएक विक्रम आहे.1985 मधे मध्यप्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार मिळाला.तर त्या सरकारने गायकीच्या क्षेत्रात,उत्तम काम करणाऱ्य्या गायकांना स्व.किशोर कुमार पारितोषिकही जाहीर केले आहे.बंगाली पत्रकार संघाचे 4 वेळा पारितोषिक विजेते.त्यांचे वरिष्ठ बंधू स्व.अशोक कुमार “दादामूनी”हे गायक नट होते.त्यांची छाप त्यांच्यावर पडली व ते ह्या क्षेत्रात उतरले.त्यांचे मधले बंधू स्व.अनुप कुमार हेही विनोदी अभिनेते होते.पण सगळ्यात पुढे हे किशोरेदाच होते.1946 ते 1987 पर्यंत क्रियाशील राहिले. त्यांनी मुख्य नट म्हणून कामे केलेली कांहीं चित्रपट!
1954— नौकरी.
1956— भाई भाई.
1957— नयी दिल्ली, आशा
चलतिका नाम गाडी.
1961— झुमरू.
1962— मिस्टर, एक्स एन बॉम्बे.
1964— पडोसन.
1975— बडतीका नाम दाढी व इतर.
त्यांनी एकंदरीत ४विवाह केले.दोन अपत्ये आहेत.अमित कुमार हे वरिष्ठ पुत्र पार्श्र्वगायक आहेत.कालांतराने चित्रपट सृष्टी बदलली,कलाकार व संगीत तंत्रही बदलले.वेगळ्या व विचित्र संगीताने,ते विचलित झाले.शेवटी शेवटी त्यांना असाध्य रोगानेही पछाडले.त्यानी सप्टेंबर 1987 साली निवृत्तीही जाहीर केली व खंडवा येथे स्वगृही परतण्याचा निर्णयही त्यांनी घेला होता.पण 13 ऑक्टोंबर 1987 साली. काळाची झडप त्यांच्यावर पडली.ह्या दिवशी त्यांना तीव्र रुदयाचा मुंबईतच झटका आला व त्यांची जीवन ज्योत माळवली. असा हा “आसामी”अवलिया अष्टपैलू कलाकार,रसिकांना सोडून, स्वर्गवासी झाला.त्यानी केलेल्या अथांग सागराच्या सेवेला,सर्व भारतीयांचा मनापासन कुर्निसात.