
प्रतिनिधी:सुरेश बोरले
पदमश्री मोहम्मद रफी महान गायका बद्दल शब्दिक मर्यादाअसल्याने, त्यांचे अनेक किस्से!आपण येथे मांडू शकत नाही, म्हणून क्षमस्व .थोडक्यात माहिती घेऊ.कोणतीही कला शिकताना, त्यासाठी माणसाला दैवाची, शारीरिक नैसर्गिक देणगी लागते किंवा मग ती कला आत्मसात करायला, मेहनत व कष्ट करायची तयारी लागते.त्या आत्मसात केलेल्या कलेवर त्या माणसाचं आपल जीवापाड प्रेम असाव लागत.तशीच एक कला आहे!जी माणसाला उपजत येत नाही.त्यासाठी अनेक वरशे प्रशिक्षण तालीम,सराव,रागांची मेहनत, सुर. ताल,लकबी आलाप आदींचा मिलाप जुळवून आणावा लागतो.ह्या सर्व गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत, त्या स्वकष्टाने मिळतात. ती कला अर्थात,गायन कला!पण स्वकष्टाने कमावलेली गायन कला व दैवी शक्तीने प्राप्त झालेली कला!ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो.कारण शेवटी स्वकष्टाने आणि मेहनतीने आत्मसात केलेल्या कलेला महत्व आहे व रसिकजन तीच पसंद करतात. भारतीय संगीत व हिंदी
चित्रपट जगतात अश्या एका उमदा,अवलिया, चिरतरुण माणसाने, बालपणापासून अमाप कष्ट घेतलेआणि मगच तो महान गायक बनला.हा महान व लोकप्रिय गायक म्हणजेच!आपले सगळ्यांचे आवडते व मनावर आदीराज्य करणारे,भारतीय फिल्मी दुनियेच्या सुवर्ण काळाचे मानकरी!स्व.मोहम्मद रफी साहेब.हे एक उमदा गायक कलाकार होते.त्यांचा जनम जानेवारी,1924 मधे कोटला
सुल्तान सिंह ब्रिटिश कालीन अमृतसर येथे झाला.बालपणी त्यांच्या दारवरन एक फकीर सकाळी,देवाची गाणी गुणगुणत जात असे!त्याच्यामागे लहानगे रफिजी,लांब पर्यंत जायचे.ही त्यांची गाण्याची रुची त्यांच्या मोठ्या बंधूंनी पहिली व घरच्यांच्या सल्ल्यानुसार, रफिजिंना अनेक दिग्गजांकडे गायन शिकण्यासाठी पाठवले.अनेक उस्तादानच्या तालमीत प्रशिक्षित!रफिजी तापून सलाकुन निघाले.अनेक खडतर प्रयत्नांनंतर नंतर ते फिल्मी दुनियेत दाखल झाले व प्रसिद्ध झाले.सुरुवातील नट म्हणूनही काम केले पण डाळ कांहीं शिजली नाही मग त्यानी आपल्या गायकिवर लक्ष्य केंद्रित केले. अश्या ह्या अस्टपैलु गायकांची आवाजाच्या चढ उताराची जादु ही कोणत्याच गायकांनकडे नव्हती.त्यानी आपल्या गायकीत,अनेक प्रेमगीत,विरह गीत, मध्यपी गीत,भजन कव्वाली,गजल,देशप्रेमी गीत आणि शस्त्रिय संगीत! हा तर त्यांचा गाभाच होता.अश्या अनेक गायनाच्या शैलीतून,त्यानी करोडो लोकांची सेवा ह्या कलेद्वारे केली. त्याकाळी अनेक चित्रपट पडीक होते. पण रफिंच्या आवाजाने ते चालले.तर अनेक नटांना त्यानी आपल्या पार्श्व गायनाने लोकप्रिय बनवले.असे अनेक किस्से आहेत.अश्या ह्या अवलियाने हिंदी गाणी तर गायलीच.त्याशिवाय उर्दू,पंजाबी गाण्यात त्यांची वाकबगरी होतीच.पणकोंकणी,आसामी,भोजपुरी,ओडिया,बंगाली,मराठी,सिंधी,गुजराथी,तमिळ,तेलगु,कन्नड,मैथिली वगैरे अनेक भारतीय भाषांमधील गाणीही त्यांनी उत्तम गायली आहेत.पण त्यांनी आंतरराष्ट्रीय भास्यांमधे अर्थात!इंग्रजी,फारशी,अरबी,सिंहली,मौरिशियन,आणि डच भाषेतही दुर्मिळ गायन केलेलं आहे.जवळ जवळ 25हजारांच्या आस पास गाण्यांची एक माळच त्यानी ओवलेली आहे.हा एक विक्रमच आहे. “गुलाबलोच”ह्या पहिल्या पंजाबी चित्रपटात त्यांना 1944 साली गाण्याची संधी मिळाली व तर ही गाण्याची संधी मिळाली. तर 1946साली ते मुंबईला आले.1948 साली, सुनो सूनो ए दूनियावलो बापुजिकी अमर कहानी!हे हिंदी गाण ध्वनीमुद्रित झालं! हे विशेष.मग मात्र रफी साहेबांनी मागे वळून पहिलच नाही. सतत 40 वर्षे फिल्मी जगतात,अनेक दिग्गज कलाकारानसाठी त्यांनी पार्श्वगायन करताना,त्यांनी स्व.किशोर कुमार ह्यानाही! रागिणी सारख्या चित्रपटात पार्श्व गायन केलेल आहे.इतकी महानता ह्या गायकांनमधे होती. सुवर्णयुग हिंदी फिल्मी जगताला ! बनविण्यात त्यांचाही मोठा महत्वाचा वाटा होता.हे विसरून चालणार नाही.अनेक महान गीतकार,संगीतकार,ह्यांच्या गळ्यातील ते ताईत होते. लक्ष्मीकांत प्यारेलाल,ही त्यांची आवडती जोडी होती.जवळ जवळ 150 च्या आसपास त्यांनी त्यांच्या बरोबर गाणी ध्वनिमुद्रित केलेली आहेत,तीही लोकप्रियआहेत.खास करून स्व.लक्ष्मीकांत हे त्यांचे जवळचे मित्र. दिनांक 30जुलै,1980रोजी,रफी साहेबांनी,लक्ष्मी प्यारेन बरोबर सकाळ पासन काम केलं.
चित्रपट होता “आसपास”.गिताचे बोल होते,”श्याम क्यू उदास है दोस्त,तू भी कही आसपास है”. हे गाण 4 वेळा ध्वनी मुद्रित करता करता,सायंकाळ झाली.हे काम संपल्यावर,रफी साहेब लक्ष्मिंना म्हणाले!एका वेगळ्या अंदाजात!अब मे चलता हू?लक्ष्मीकांत एका वेगळ्या नजरेने त्यांच्याकड पहात राहिले.30जुलै,1980 ही त्यांच्या साठी काळरात्र ठरली.रात्री 10.30 वाजता त्यांना हृदयाचा तीव्र झटका आला व त्यांची जीवन यात्रा संपली.ही बातमी वाऱ्या सारखी पसरली.31जुलै,रोजी करोडोंच्या संख्येने,चाहते त्यांच्या निवासस्थानी अंत यात्रेसाठी जमा झाले.आपल्या शाश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला व हा अवलिया सोनेरी गळ्याचा गायक,सांताक्रुझ येथील कब्रस्तानात,
आजही, चीरनिद्रेत विलीन आहे.त्यांनी केलेल्या लोकांच्या अविरत सेवेला,तमाम रसिकांतर्फे श्रद्धांजली!
पद्मश्री रफी साहेबांना मिळालेली पारितोषिके. पद्मश्री –1967.
—सहा फिल्म फेअर पारितोषिक.
—BFJA उत्कृष्ठ पुरुष गायक पारितोषिक .
— राष्ट्रीय उत्कृष्ठ गायक पारितोषिक.
— तसेच अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.