
photo :Ramesh Hindu rao Dhumal
मुंबई :सहकार क्षेत्रातील दीर्घकालीन अनुभव, कार्यक्षम नेतृत्व आणि समर्पित सेवाभाव यामुळे . रमेश हिंदुराव धुमाळ यांची सहकार भारती – प्रचार व प्रसिद्धी प्रमुख, मुंबई या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या दोन दशकांपासून धुमाळ यांनी सहकारी संस्था, बँका, हाउसिंग सोसायट्या तसेच इन्शुरन्स क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय व प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या सततच्या कार्यतत्परतेमुळे आणि सहकार तत्वज्ञानाच्या प्रचारासाठी घेतलेल्या प्रयत्नांमुळे ते एक प्रभावी आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
ही निवड केवळ त्यांच्या कार्याची पावती नसून, सहकार चळवळीला नवसंजीवनी देणारे पाऊल आहे. त्यांच्या माध्यमातून सहकार विचारसरणी सामान्य जनतेपर्यंत पोहोचेल आणि सहकारी चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
“सहकारातून समृद्धीकडे” या विचारधारेने प्रेरित होत, धुमाळ हे आपल्या नव्या जबाबदारीतून सहकार मूल्यांचा व्यापक प्रचार करतील, असा विश्वास सहकार भारती मुंबई प्रदेशाध्यक्ष राहुल पाटील यांनी व्यक्त केला आणि धुमाळ यांना त्यांच्या नवीन कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Great
Congrats