
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,मागील बऱ्याच दिवसां पासन गोरेगाव पूर्वेतील सोनावाला रस्ता आणि सोनल अपार्टमेंट कडील रस्त्याकडील कोप्र्याची बाजू व प्रज्ञा बोधिनी शाळे कडील डाव्या बाजूच्या रस्त्याच्या कोपरा,या त्रोकोणी फाट्यावर बऱ्याच दिवसांन पासन पालिकेने रस्ता खोदून ठेलेला आहे.त्यामधे जलवाहिनीचे काम मागील अनेक दिवसापासून सुरू आहे.शाळे जवळ खानलेल्या या खड्ड्यामुळे,शाळेत ये जा करणाऱ्या मुलांची वाताहत होतेय,विध्यार्थी पालक व नागरिकांना ये जा करण्यासाठीही त्रास होत आहे.तर एक टोक सोनावाला रस्त्यांच स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या औद्योगीक वसाहती मधील कर्मचारी व वाहने ही या रस्त्याचे वापर करतात त्यामुळे वाहतूक कोंडी आणि गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच सतत चे हॉर्न वाजत असल्याने ध्वनी प्रदूष्णात ही प्रचंड वाढ झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत तसेचवायू प्रदूष्णात ही भर पडली असल्याचे बोलले जात असून पालिकेने जलवाहिनीचे कार्य त्वरित पूर्ण करून खड्डा भरावे व रस्ता पूर्ववत करावा.
विद्यार्थ्यांना त्रास न देता कार्य लवकरात लवकर पूर्ण करने आवश्यक आहे.