
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,दोन दिवसापासून दूरचित्रवाणी खणखणतोय, राष्ट्रवादीचे महत्त्वाचे व येणारे उदयनमुख मुख्यमंत्री अशी यांची ख्याती होती असे, अजित दादा पवार हे भाजपच्या गोटात दाखल व मंत्री खाते वाटपासाठी अजित दादा व आमदार सागर बंगल्यावर हजर.काय चालला आहे महाराष्ट्रात? कोणाचा कोणाला पायपोस नाही. महाराष्ट्रात राजकारण हा धगधगता ज्वालामुखी आहे. त्याचा लावा उद्रेक कुठे व कसा होईल, याचा भरोसा नाही. लावा कुठून कसा वाहत जाईल याचा नेम नाही.आधी शिवसेना व भाजपात तूट पडली म्हणून शिवसेनेनी राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला. मग तो घरोबा, शिवसेनेतील एकनाथ शिंदे व 40 आमदारांना मंजूर नाही झाला, मग त्यांनी बंड पुकारून बाळासाहेबांची शिवसेना पक्ष स्थापित करून, देवेंद्र फडणवीसांच्या भाजपा बरोबर,मोट बांधली.तर आता अजित दादांनी 9 आमदरांसहित,भाजपाची वाट धरली आहे. शेवटी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडामोडीच्या मागे, काही ना काही तरी संकल्पित सूत्रे आहेत. ही संकलपित सूत्रे खरी का खोटी संकल्प भाकितच जानो. ज्या वेळेला, स्वर्गीय,वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते,त्यावेळेस राजकारणात शहाला काटशह देण्यासाठी, वसंतरावांनी स्वर्गीय, बाळासाहेब यांना राजकारणात सक्रिय केले व शिवसेनेचा जन्म झाला.कारण कम्युनिस्ट पक्ष हा मुंबई जास्तीत जास्त राजकारणावर पकड घेत होता, त्यांच्या काटा काढण्यासाठी वसंतरावांनी शिवसेनेला जन्माला घातली अशी जुनी लोक अजूनही सांगतात.नियती कोणाला सोडत नाही जर हे संकल्पचित्र खरी असतील? तोच फटका बाळासाहेबांना पडला. शिवसेनेत उभी फूट पडली अनेक मातब्बर नेते बाहेर गेले. त्यांनी अनेक पक्षात माकड उड्या मारल्या, घेतल्या,अजूनही घेत आहेत. शेवटी गद्दारी ती गद्दारीच असते. परंतु पडद्यामागची भूमिका अशी आहे, असा लोकांचा संशय आहे? बाळासाहेबांच्या निर्णयावर,राज ठाकरे हे नाराज होते.मग त्यांनी त्या संबंधित भीष्माचार्य शरद पवारांची भेट घेतली व ही समस्या त्यांना सांगितली.ह्या समस्येवर राज ठाकरेंनी , स्वतःचा पक्ष उभा करावा! अशी सूचना भीष्माचार्यांनी दिली. राज साहेबांचा मनसे उभा राहिला. मग बाळा साहेबांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी, भीष्माचार्यांनी मनसेला खतपाणी घातले व तेच मनसेचे जन्मदाते आहेत! असे अजूनही बुजूर्ग व सुज्ञ मंडळी सांगतात. मग नियतीच काल चक्र भीष्माचार्य वरही आलं,आपण कितीही तेल लावलेले पैलवान असा! पण नियतीच्या धोबी पछाडीत कोणी सुटत नाही. आज शरद पवार साहेबांच्या पक्षातही उभी फुट पडलेली आहे. त्यांच्या घरच्या माणसानी घरभेदीपणा केलेला आहे. मागे एकदा अजित दादांनी सकाळच्या प्रहरी फडणवीसंना बरोबर, शपथविधी घेतला होता. पण भीष्माचार्यांच्या सांगण्या वरून प्रयत्न फसला, तर काही दिवसापूर्वी एका बैठकीत, महत्त्वाची पदे वाटप निर्णयावर, निर्णय होणार होता, तशी बैठकीही झाली. महत्त्वाच्या पदाचे वाटप झाले,ते पद दादांना मिळेल असं वाटत असतानाच, शरद पवारांनी महत्त्वाचे पद बहाल केले ते आमदार, सुप्रिया सुळे यांना . येथेच वादाची ठिणगी पडली. कारण या सभेतून अजितदादांनी काढता पाय घेतला आणि त्याचा प्रत्यय आज आता आला. सध्या परिस्थिती उद्धव ठाकरे यांची खराब आहे.कारण एनसीपीच्या जोरावर, उद्धवजींनी महाविकास आघाडीत बनवली होती. आता फुटली.ही आघाडी एनसीपीची, एकनाथ शिंदे गटाला चालते का? असं जनता म्हणत आहे. कारण एनसीपीच्या आघाडीमुळेच, शिंदे गटातील माणसे नाराज होती. मग आता तर भाजपात त्यांच्या सोबतीला एनसीपीही आलेली आहे? आता शिंदे शिवसेना गट काय करणार? याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. शेवटी गद्दारी ती गद्दारी मग ती सरळ सरळ असो का, पडद्यामागची असो, नियतीचा मार हा सगळ्यांना या उभ्या हयातीतच सपाटून खायचा आहे. पहा शिवसेनेतून फुटलेले आधीचे, त्यांची परिस्थिती काय आहे?तर आता अलीबाबा आणि चाळीस चोरांची परिस्थिती काय होईल? ते नियतीच दाखवेल.असे लोकांना वाटते, तर आता शिंदे गटापासून राज ठाकरे , उद्धव ठाकरे , अजित पवार साहेब, शरद पवार आपल्या पक्षांच्या आणीबाणी बैठका घेत आहेत. म्हणजेच या उद्रेकाने आणीबाणी निर्माण झाली. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता सुरुंग कुठे फुटेल? याचा नेम नाही.म्हणून या भीतीने जो तो नेता आपल्या, पक्षाची चाचपणी करताना दिसतोय. असे जनतेला वाटते. मंत्रालयात राष्ट्रवादीच्या,नवीन अमदरांसाठी, नवीन केबिन तयार करायलाही घेतलेल्या आहेत, फरफट होत आहे ती महाराष्ट्राच्या जनतेची. जास्त एकटा पडला आहे तो भूमिपुत्र!आता अशी बॅनर्स लागत आहेत की,माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यावे! आता काय म्हणावे?