राजकीय वाचाळवी्रांच्या बेलगामी बोलण्यावर,लगाम हवा!

Share

प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई : भारतामध्ये “लोकशाही”आहे!येथे बोलण्याचे स्वतंत्र आहे.पण हे स्वतंत्र म्हणजे ऊठ सूट काही बेताल व्यतव्य करणारे नसावे किंवा वैयक्तिक टीका नसावी?ह्याच भान
लोकप्रतिनिधींनी ठेवावे.कारण सध्या भाजपचे गोपीचंद पडळकर हे सुसाट वेगाने आपली वाणी विरुद्ध पक्षातील राजकीय लोकप्रतिनिधीं विरुद्द्ध वापरताना दिसत आहे.महाराष्ट्रातील प्रखर व जहाल नेते मा.शरदजी पवार ह्यांच्या परिवारा विरोधात असभ्य
भाष्य केले होते.तर आता जयंत पाटील ह्यांच्या विरोधात ते खालच्या दर्ज्याची भाषा वापरून, ते टीका करताना दिसत आहेत.हे राजवटीत राज्यकर्त्या पक्षाला हे हानीकारक का आहे.हे जाणून घ्यावे!असे बेताल बोलणे

हे त्या पक्षाला अधोगतीकडे घेऊन जाऊ शकते,ही निश्चित आहे. कारण आपण लोकप्रतिनिधी आहात,आपले आचरण चांगले असायला हवे. त्यासाठी आपल्याला जनतेने विधान सभा अथवा लोकसभेत पाठवले आहे!ह्याची जाण आपण ठेवावी. सदर बाबत पवार साहेबांनी मा.मुख्यमंत्र्यांना त्या अशयाचे पत्र ही पाठवलेले आहे.तर मुख्यमंत्र्यांनी तशी समज पडळकरांना दिलेली आहे,असे त्यांनी जाहीरपणे विधान केलेले आहे.त्यामुळे टीका ही जालीम असावी पण बोचरी नसावी.उदा.स्व.आचार्य अत्रे किंवा स्व.बाळासाहेब ठाकरे नाहीतर पु. ल.देशपांडे ह्यांनी केलेली निखळ व भानिक टीका टिपणींच शानदार उदाहरण देता येईल.


Share

2 thoughts on “राजकीय वाचाळवी्रांच्या बेलगामी बोलण्यावर,लगाम हवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *