
प्रतिनिधी :मिलन शाह
नागपूर ते मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण देशाची सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते दिनांक 11 डिसेंबर रोजी झाले आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकण विभाग थेट जोडले जाणार असून या महामार्गावरील दहा समृद्ध जिल्ह्यांचा वेगवान प्रवास भविष्यात पाहायला मिळेल. समृद्धी महामार्गामुळे ग्रामीण विकास तसेच शेती व्यवसायाला नवा आयाम मिळणार आहे, त्यामुळे हा महामार्ग सर्वांगाने महाराष्ट्राला समृद्धीकडे नेणारा ठरणार आहे.