राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील वक्तव्य करणाऱ्या आरोपीला अटक

Share

प्रतिनिधी :मिलन शाह

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या जयेश पडवळे या आरोपीला पोलिसांनी आज भादंवि कलम 354(A)(1)(4), 500 , 509 आणि IT act 67 नुसार अटक केली आहे.

याबाबतीत अधिक माहिती घेतली असता रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट आणि शिवीगाळ करणाऱ्या जयेश पडवळे , निशांत नाईक , संतोष एकनाथ चाकणकर, सुनील खळदकर, शैलेश भांबीड , अक्षय पांडे, ज्ञानेश्वर झोळेकर , अनिल सूर्यवंशी ,पुष्पेंद्र बने या ९ जणांविरुद्ध जून महिन्यामध्ये मुंबईतील बांद्रा येथील खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये वरील सर्व कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता आणि पोलीस अधिक तपास करत होते यामधील जयेश पडवळे या आरोपीला आज पालघर येथून अटक करण्यात आली आहे , तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपींवर देखील अटकेची कार्यवाही चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *