प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई: मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे हे मीरा भाईंदर येथील जनतेचे उस्फूर्तपणे काढलेल्या मोर्चाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी भेटीस आले. जी घटना मीरा भाईंदरमध्ये घडली,त्याच ठिकाणी त्यांची सभा झाली.दरम्यान बोरिवलीत त्यांचे स्वागत होणार होत व त्यांना मराठी मानाची तलवार भेट देण्यात येणार होती.पण गर्दी मुळे हा स्वागत समारंभ रद्द केला व ते थेट मीरा भाईंदर येथे बालाजी ओमशांती ओम् चौक व जोधपूर फरसाण स्वीट मार्ट जेथे ही वादाची ठिणगी पडली होती, तेथेच राज साहेबांचे जंगी स्वागत झाले आणि शेजारीच मनसे शाखेचे उद्घघाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.ही अभूतपूर्व सभा झाली.सायंकाळी ठीक ८.००वाजता ते व्यासपीठावर पोहोचले.सभेची सुरुवात त्यांनी! कानाच्या वर ज्यांना ऐकायला येत नाही,त्यांना कानाखाली पडल्यावरच ऐकालच येणार!ह्या शब्दाने केली.छोटीशी घटना येथे घडली होती,पण भाजप आमदाराने व्यापाऱ्यांना भडकावून आणि राजकारण खेळून तो मोर्चा काढला होता,त्यामुळे हा गोंधळ झाला.ते पुढे म्हणाले!हिंदी लादणार असाल तर ती नाही बोलणार जा !मुलांवर हिंदी सक्ती कराल तर शाळाच बंद करू.मुंबई महाराष्ट्राला मिळू नये असा वल्लभ भाई पटेलांचा विरोध होता.हे दुखदआहे.हा डाव त्यादिवसापासूनच खेळला जात आहे.कोण भाजपा खासदार निशिकांत दुबे ज्यांनी मराठी माणसाला पटक पटक कर मारेंगे! अस आव्हान केलंय. त्याला मुंबई मे आओ आपको समुंदर मे डुबे डुबे कर मारेंगे असे उत्तर दिले. नुकतीच गुजरातमध्ये बलात्कार घटना घडली.२०हजार बिहारींना तिकडून हाकलले,ह्यांचे लाड फक्त येथेच,ही बातमी बनली का?कर्नाटकात यू पी व इतर रिक्षावाल्यानला हाकलले बातमी बनली का?आंध्रात तेलगु प्रथम बातमी बनली का? महाराष्ट्र आपल्या बापाचाच आहे.५६ इंच छाती काढून चाला.मराठी बद्दल अपशब्द काढल्यास,चोपून काढा. कोणत्याही भाषेचा विरोध नाही.प्रत्येक भाषा ही पवित्र आहे .प्रत्येक भाषेला इतिहास आहे.हिंदीला फक्त दोनशे वर्षाचा आहे.तर मराठीला तीन हजार वर्षाचा आहे.म्हणून अभिजात आहे. हिंदीने अनेक भाषा खंडित केल्या.परप्रतियांनी मराठी शिकावी!येथे आनंदाने रहावे,असे त्यांनी परप्रांतियांना सूचित केले.मराठीला विरोध केल्यास “खळखट्याक”होणारच हे तुम्ही लक्षात ठेवा.
सभेला मनसैनिक,शिवसैनिक व मराठी प्रेमी बिगर मराठी लोकही उपस्थित होते हे विशेष. त्यांनी आमचा प्रांत ही आमची जन्मभूमी आहे.महाराष्ट्र आमची कर्म भूमी आहे.त्यामुळे आम्ही मराठीचा मान राखतोच आणि राखणार! हे इतर भाषिकांनी स्पष्ट केले.मनसे पदाधिकारी महिलां रणरागिणीचीही प्रचंड उपस्थिती होती.एकंदरीत पहिल्यांदाच एवढी प्रचंड सभा ह्या विभागात झाली,शेवटी मैदान कमी पडले!हा एक विक्रम आहे.परंतु राज साहेब म्हात्र हिंदी पत्रकारांवर नाराज झाले.ते करत असलेला भेदभाव हा हानीकारक आहे.कितीतरी भयानक बातम्या तुम्ही छापत नाहीत.म्हात्र मुंबई महाराष्ट्रात काय घडल्यास, ते जगभर होत! हे थांबवा. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.लाखोच्या संखेने खास करून,मराठी जनता हजर होती.
राजगर्जना