
File photo
प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
नुकताच भाजपाने काढलेल्या हिंदी भाषा जी आर विरोधात,मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. मा.राज साहेब ठाकरे ( मनसे)ह्यांचा तीव्र विरोध व सर्व पक्षीय मराठी बांधवांना हिंदी विरोधी केलेले आवाहन,ह्याच मुद्द्यावर वर्तमान सरकारला दोन्ही जी आर रद्द करावे लागले.ह्याच समस्येवर शिवसेना+मनसे झालेली नुकतीच युती!ह्या दोन मोठ्याघटना घडत असताना, काल एका परप्रांतीय युवकाने ! पुणे स्टेशनला पूर्णाकृती राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. सुरज शुक्ला असे त्या तरुणाचे नाव असून,तो रेल्वे हद्दीतील महात्माजींच्या पुतळ्यावर हातात कोयता घेऊन चढला व त्याने कोयत्याने क्लिस्ट पद्धतीने प्रहार केले.हा व्हिडीओ सुद्धा झपाट्याने वायरल झाला आहे.ह्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी त्वरित ताब्यात घेऊन,त्याची चौकशी केली असता तो वाराणशी येथील रहिवाशी असून,सध्या तो पुणे येथे स्थायिक आहे.तर त्याची पत्नी ही आय टी क्षेत्रात आहे.ती सध्या गावी आहे.तो धार्मिक ठिकाणी जाऊन,रुद्राक्ष माळा विकतो.तो कुंभ मेळ्यातही गेला होता.तर थोडासा विचित्र व नैराश्यात आहे की कांहीं राजकीय डावपेच आहेत?ते पहायचे आहे,अस पोलिसांचं म्हणणं आहे.पोलिस तपास पुढे चालू आहे.त्यासाठी त्याला ताब्यात ठेवले आहे.परंतु लोकांचं म्हणणं आहे,की त्याच्या तपासाचा अहवाल कांहीही असो ! किंवा तो कोणत्याही स्थितीत असो,पण प्रांतीय आता जास्तच मुजोर झालेले आहेत का?.हे ह्या प्रकरणातून असच प्रतीत होत.एका राष्ट्रीय पुरुषाची विटंबना त्याने ज्या प्रकारे केलेली आहे,ह्या प्रसंगाची राज्यकर्त्यांनी ह्या प्रकरणाची दाखल घेऊन,कठोर कारवाई होने अपेक्षित आहे जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाही.
Pathetic