प्रतिनिधी :वैशाली महाडिक
राष्ट्रवादी काँग्रेस चे मोठे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाडांच्या या ट्विटची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, आपल्याविरोधात 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याने आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे आव्हाड यांनी सांगितले आहे.
ठाण्यातील वर्तक पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा गुन्हा आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. आता मुंब्रा येथे त्यांच्याविरोधात महिलेच्या आरोपानंतर विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. आपल्याविरोधात 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याने आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे . आपण पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार असल्याचे ही त्यांनी आपल्या ट्वीर च्या माध्यमातून माहिती दिली आहे.
बीजेपी च्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे वादात सापडले आहेत. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळेजितेंद्र आव्हाड हे व्यथित झाले आहेत. त्यांनी ट्विट करून माहिती देत म्हणाले आहेत की त्यांच्या विरोधात पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर आव्हाड कमालीचे संतप्त झाले आहेत . या पोलिसी अत्याचाराविरोधात विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.. अवघ्या 72 तासांत आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार असल्याचे ही जितेंद्र आव्हाड म्हणाले. मी पोलिसांच्या अत्याचाराविरोधात लढणार आहे. त्यामुळे मी माझ्या विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देणार आहे, असे त्यांनी ट्विटमधून माहिती दिली आहे.