प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मालाड, राष्ट्र सेवा दल, मालवणी; केंद्राचे जेष्ठ कार्यकर्ते तसेच माजी कार्यकारिणी सदस्य साथी विलास नरम यांचे वयाच्या 57 व्या वर्षी दि.28ऑगस्ट, रात्रौ 11.30 वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांची मुळ वैचारीक जडनघडन – राष्ट्र सेवा दल मध्ये झाली.तसेच ते युथ हॉस्टेल असोशिएशन ऑफ इंडिया, मालाड युनिटचे क्रियाशील सदस्य होते.तसेच राष्ट्र सेवा दलाच्या सुवर्णं वर्षी त्यांनी ग्रंथालयची जवाबदारी यशस्वी पार पाडली होती.त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात मागे- पत्नी, 2मुलगे, आई व दोन बहिणी असा भला मोठा परिवार आहे. विलास यांचा अंत्यविधी मालवणी स्मशान भूमीत सकाळी 11.30 वाजता करण्यात आला. प्रसंगी अनेक कार्यकर्ते व मित्र मंडळी उपस्थित होते.
दु:खद समाचार. मन:पूर्वक श्रद्धांजली