राष्ट्र सेवा दलाची पूरग्रस्तांसोबत दिवाळी …

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

सीना दारफळ (जि.सोलापूर) : नवभारत विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्र सेवा दलाने पूरग्रस्तांसोबत दिवाळी आनंद संध्या साजरी करुन आशेचे दिवे प्रज्वलित केले.

मुख्याध्यापक धावारे सरांनी सर्वांचे स्वागत केले. राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र कोअरचे मुख्य संयोजक राजा अवसक यांनी प्रास्ताविकामध्ये मनोगत व्यक्त करताना या आपत्तीत तर राष्ट्र सेवा दल शाळेसोबत आहेच पण नंतरही या शाळेतून चांगले नागरिक तयार व्हावेत यासाठी सतत मदत करणार आहे असे आश्वासन दिले.

पूरग्रस्त भागातील मुलांनी आपली गाणी, नृत्ये , नाटुकले सादर करत आपले दुःख झटकण्याचा प्रयत्न केला. तसेच पाडू चला रे भिंत असा विश्वास देत राष्ट्रीय एकात्मतेचा विचार दृढ करणेचा प्रयत्न केला.

त्यानंतर पुण्याच्या कलापथकाने मनोरंजन करत प्रबोधन करणारा आविष्कार संपन्न केला. यामध्ये नृत्य, नाट्य, गायन याचा सुंदर संयोग होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्ण गावातील लोक पटांगणात एकत्र आले आणि दिवाळीतून दिला जाणारा आनंद आणि स्नेह या निमित्ताने अनुभवला.

यासाठी संजय गायकवाड, दिपाली आपटे, वसंत एकबोटे, घोगरे महाराज, सुहास कोते, जीवराज सावंत, सरपंच अशोक शिंदे, रोहित दळवी , रोहित शिंदे, प्रकाश कदम, सुखदेव इल्हे, आरिफ पानारी, मुस्तफा शिकलगार यांनी प्रयत्न केले. वैभवी आढाव यांच्या पणती जपून ठेवा या गीत सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

संजय रेंदाळकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय शिंदे यांनी आभार मानले.


Share

4 thoughts on “राष्ट्र सेवा दलाची पूरग्रस्तांसोबत दिवाळी …

  1. राष्ट्र सेवा दल नेहमी लोकाचया सेवे साठी हजर असतो खराच दिवाली सण मना पासुन साजरा केला अस वाटत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *