राहुल गांधींनी भारत जोडण्याचे काम केले : सुरेशचंद्र राजहंस.

Share


प्रतिनिधी :मिलन शहा
भारत जोडो यात्रेतून देशातील एकता व विविधता अबाधित ठेवण्याचे काम झाले आहे.भारत जोडो यात्रेची दखल जगाने घेतली. भारत जोडो पदयात्रेमुळे देशातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला. देशातील हुकुमशाही कारभाराविरोधात ‘डरो मत’ चा संदेश देत राहुल गांधी यांनी जनतेमध्ये नवी ऊर्जा व उत्साह आणला, असे प्रतिपादन काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेला महाराष्ट्रातील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. समाजातील सर्व जाती-धर्माचे लोक या पदयात्रेत सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यापासून मध्यप्रदेशात दाखल होईपर्यंत काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस हे प्रदेश यात्री म्हणून या ऐतिहासिक पदयात्रेत चालत होते. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची या पदयात्रेदरम्यान वाशिम येथे भेट घेऊन संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांवर राहुल यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. राहुल यांच्याशी भेटून चर्चा करण्याचा अनुभव वेगळाच आनंद देणार ठरला.भारतयात्रींबरोबर दररोज चाललो तो अनुभव आय़ुष्यभरची आठवण ठरेल असा आहे असे राजहंस म्हणाले.
यात्रेमुळे लोकांमध्ये नवा जोश व उत्साह संचारला आहे तसेच सर्व समाजातील लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसादही मिळला. त्यामुळेच विरोधकाकंडून राहुल गांधी यांच्या प्रत्येक हालचालीतून त्रुटी शोधून टीका करण्याचे काम केले गेले परंतु राहुल गांधी किंवा पदयात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादावर याचा काडीचाही परिणाम झाला नाही उलट लोकांचा प्रतिसाद वाढत गेला.

लोकशाही व्यवस्था,संविधानाला धाब्यावर बसवून भाजपा सरकार काम करत आहे. लोकशाही व्यवस्था व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान वाचवण्याच्या या लढाईत आपलाही सहभाग असला पाहिजे म्हणून लोकांचा प्रतिसाद सातत्याने वाढत गेला. शेगांव, बुलढाणा येथे झालेली ऐतिहासिक विराट सभा भारत जोडोला लोकांचा लाभलेला प्रचंड प्रतिसाद याची साक्ष देणारी होती असेही राजहंस म्हणाले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *