
प्रतिनिधी :मिलन शाह
मुंबई,काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. समाजातील सर्व जाती-धर्माचे लोक या पदयात्रेत सहभागी होत आहेत. पदयात्रेमुळे देशातील वातावरण बदलले असून जाती-धर्मात फूट पाडून राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजपाला धडकी भरली आहे, असे मातंग समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश व उत्साह संचारला आहे तसेच सर्व समाजातील लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे त्यामुळेच विरोधकाकंडून राहुल गांधी यांच्या प्रत्येक हालचालीतून त्रुटी शोधून टीका करण्याचे काम केले गेले. ख्रिश्चन धर्मगुरुला भेटल्यावरून टीका केली नंतर एका लहान मुस्लीम मुलीने राहुल गांधी यांची भेट घेतली त्यालाही धार्मिक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा राहुल गांधी किंवा पदयात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादावर काडीचाही परिणाम झाला नाही उलट लोकांचा प्रतिसाद वाढत आहे.
लोकशाही व्यवस्था,संविधानाला धाब्यावर बसवून भाजपा सरकार काम करत आहे. लोकशाही व्यवस्था व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान वाचवण्याच्या या लढाईत आपलाही सहभाग असला पाहिजे म्हणून लोकांला प्रतिसाद वाढत आहे. भारत जोडो यात्रेतून देशातील एकता व विविधता अबाधित ठेवण्याचे कामही होत आहे.भारत जोडो यात्रेची दखल अनेकांना घ्यावी लागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दिल्लीतील एका मशिदीत जाऊन इमामांची भेट घ्यावी लागली. तर कालपर्यंत काँग्रेस व राहुल गांधी यांच्या टीका करणारे रामदेव बाबा यांनीही यात्रेचे व राहुल गांधी यांचे कौतुक केले. देशातील 12 राज्ये, 3500 किलोमीटरचे अंतर, दररोज 25 किमी पदयात्रा, सलग 150 दिवस अथकपणे ही पदयात्रा सुरु राहणार आहे. या पदयात्रेमुळे देशातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होण्यास मदत होईल व राहुल गांधी यांचे नेतृत्वही एका मोठ्या उंचीवर जाईल असा विश्वास राजहंस यांनी व्यक्त केला.