
प्रतिनिधी :सुरेश बोरले
साधारणपणे १९७० चे दशक असावे, तो काळ भारतीय चित्रपट सृष्टीचा सुवर्ण होता. त्यावेळेला एक नटी अशी होती की, ती चरित्र अभिनेत्री म्हणून आईची कामे चित्रपटांत करायची नेहमीचा आपला दुखी चेहरा, आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी, वासल्याने भारलेली माता पडद्यावर पेश करायची. ठरलेली पांढरी साडी प्रधान केलेली, डोक्यावरती पदर.डोक्यावरचे केस वयोमनाने पांढरे, अशी नटी बऱ्याच चित्रपटात मी पहिली. सत्तरच्या दशकात म्हणजे तसं माज वय लहानच होत, पण किशोर वयात येण्याची सुरुवात होती. किशोर वयात मित्र भेटले की, तेव्हा फिल्मी गप्पा व्हायच्या, त्या रंगायच्या. त्या मध्ये ह्या मातोश्री चे नाव निघायचे.मग वयानुसार,या मातेचे नाव कळले. त्यांचं नाव स्वर्गीय. निरुपा रॉय. आता त्या हयात नाहीत.पण त्यांनी पडद्यावरील साकारलेल्या भूमिका या अजरामर आहेत. लोकांच्या ध्यानीमनी आहेत. खास करून १९८० च्या दशकातील “दिवार”ह्या चित्रपटात दोन दिग्गज कलाकार होते ते म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि स्वर्गीय. शशी कपूर, यांच्या मातेचा रोल त्यांनी केला होता.रॉय ह्यांची ही अदाकारी दीर्घकाळ लोकांच्या मनात राहिली. त्यांच्याही जीवनात दीवार सारख्या घटना घडल्या,म्हणून आपण त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ. स्वर्गीय. निरूपा रॉय,यांच मूळ नाव, कोकिळा किशोरचंद्र बलसारा. त्या गुजराती समाजा पैकी होत्या. त्यांचा जन्म ४ जानेवारी, १९३१ रोजी ब्रिटिश कालीन गुजरात मधील बलसाड येथे झाला. एक कलाकार म्हणून त्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्या अदाकारी पेश केल्या होत्या.१९४६ मध्ये त्यांचा विवाह स्वर्गीय. कमल रॉय यांच्याशी झाला व त्या कोकिळा बलसाराच्या रॉय झाल्या. त्यांचे यजमानही कलाकार असल्याने, दोघांनी नशीब आजमवण्या साठी मुंबई गाठली. परंतु या चंदेरी दुनियेत स्वर्गीय. कमल रॉय यांचा काही निभाव लागला नाही. निरुपा रॉय गुजराती असल्याने, त्यांना स्वर्गीय अमर राज यांनी “रेनक देवी” या आपल्या पहिल्या चित्रपटात १९४८ मध्ये पहिली संधी दिली. नंतर गुणसुंदरी या चित्रपटात त्यांना काम मिळाले. येथेच त्या गुजराती फिल्म दुनियेत त्या वावरल्या. इथूनच त्यांचा फिल्मी प्रवास सुरू झाला.सुरुवातीच्या उमेदीच्या काळात, त्यांनी चित्रपटात मुख्य नटीच्या भूमिका पेश केल्या.मात्र नंतर वयाच्या मानाने त्यांनी चरित्र अभिनेत्री म्हणून मान मिळवला, हे विशेष. अनेक पौराणिक चित्रपटात त्यांनी चांगल्या भूमिका केल्या. त्यामुळे त्यांना देवाचाही आशीर्वाद लागला, असं समजू. १९६० च्या दशकात स्वर्गीय.देवानंद,धर्मेंद्र सारख्या दिग्गज कलाकारान बरोबर चरित्र अभिनेत्री म्हणून उत्तम कामे केली. विशेष सांगायचे झाल्यास,१९५८ मध्ये स्वर्गीय. देवानंद पेक्षा आठ वर्षांनी लहान असून सुद्धा, एका चित्रपटात त्यांच्या आईची भूमिका ही त्यांनी केलेली आहे. अनेक नामांकित कलाकारां बरोबर, त्यांनी दर्जेदार कामे चित्रपटांत केली.परंतु चरित्र अभिनेत्री साकारताना, आईच्या भूमिकांपासून, मात्र आई हा छाप त्यांना कायमचा लागला.तर दिग्गज कलाकारां मध्ये स्वर्गीय. दादा मुनी अर्थात स्वर्गीय. अशोक कुमार,बलराज सहानी, भारत भूषण सारखे कलाकार आहेत. गुजराती चित्रपटापासून सुरुवात केलेल्या ह्या अभिनेत्रीने, हिंदी चित्रपट नगरीत, कलेच्या जोरावर आपले नाव उच्च स्थानी नेल. मिळालेल्या ह्या संधीचे त्यांनी सोने केले. आपल्या उमेदीच्या काळासह, साठ वर्षात त्यांनी एकंदरीत २५० चित्रपट कामे केली. आपल्या या कलेच्या देवताला त्यांनी जपलं. तशा त्या धार्मिक होत्या.कारण पौराणिक चित्रपटांतून काम करताना.जी आपल्याला भूमिका मिळाल्या त्या त्यांनी तन मन धन आरपून केल्या. म्हणून त्यांचे पौराणिक चित्रपट लोकप्रिय झाले. विशेष सांगायचे म्हणजे काही भक्ती भाव जपणारी लोक त्यांच्या घरी अक्षरश्या त्यांच्या पाया पडायला यायची. हे भाग्य फक्त भाग्यवंतांनाच लाभत.त्यासाठी त्यांनी देवीची प्रतिमा,जशीच्य तशी लोकां समोर उभी केली.त्यामुळे ते साध्य झालं. स्वर्गीय.रॉय यांना दोन पुत्र व दोन पूत्री परिवार आहे. परंतु वर सांगितल्या प्रमाणे,दिवार सिनेमा सारखा संपत्ती वाद त्यांच्या परिवारातही झाला.असो! तो आपल्या प्रत्येकाच्या परिवाराचा प्रश्न आहे. अशा या कसलेल्या कलाकाराचे दुखद निधन, दिनांक 13 ऑक्टोबर , २००४ रोजी झाले.या सुवर्ण युगाच्या साक्षीदारला, आमचा मनापासून सलाम.
स्वर्गीय.निरुपा रॉय,
यांना मिळालेली प्रितोशिक.
१.१९५६ मुनिमजी चित्रपट.
२.१९६२ छाया या चित्रपट.
३.१९६५ शहनाई चित्रपट.
४.मध्ये बंगाल जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री.
५. आजीवन पुरस्कार.