
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील भायखला रेल्वे इन्स्टिट्यूट निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल तर परळ इन्स्टिट्यूटमध्ये मनसे व विविध संघटनांच्या समर्थनासह विजय मिळवलेल्या भारतीय रेल कामगार सेनेच्या उमेदवारांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत भविष्यात रेल्वे कर्मचारी हितासाठी अधिक सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
या भेटीप्रसंगी शिवसेना सचिव व रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर, कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या विजयानंतर रेल कर्मचारी संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
अभिनंदन
Congratulations
Congratulations